व्हीआयपींचे साईदर्शन महागले

By Admin | Published: February 25, 2016 09:03 PM2016-02-25T21:03:38+5:302016-02-25T21:03:38+5:30

शिर्डी-रेल्वे अर्थसंकल्पात कोणतीही दरवाढ प्रस्तावित नसली तरी साईबाबा संस्थान व्यवस्थापनाने मात्र व्हीआयपींच्या दर्शन व आरती पासेसच्या शुल्कात १ मार्च पासुन वाढ करणार

VIPs show great price | व्हीआयपींचे साईदर्शन महागले

व्हीआयपींचे साईदर्शन महागले

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

शिर्डी, दि. २५ - शिर्डी-रेल्वे अर्थसंकल्पात कोणतीही दरवाढ प्रस्तावित नसली तरी साईबाबा संस्थान व्यवस्थापनाने मात्र व्हीआयपींच्या दर्शन व आरती पासेसच्या शुल्कात १ मार्च पासुन वाढ करण्या बरोबरच संस्थान राहणाऱ्या किंवा प्रसादालयात व्हीआयपी कक्षात दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या कोणात्याही शिफारशी शिवाय दर्शन,आरती पासेस देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांनी दिली़


साईसंस्थानने गर्दी व्यवस्थापनासाठी दर्शन व आरती पासेस सशुल्क केले होते़ तरीही  संख्येत घट झाली नाही,संस्थानला मात्र या माध्यमातुन कोट्यावधीचे उत्पन्न मिळाले़संस्थानने १ मार्च पासुन दर्शन व आरतीच्या पासेसच्या दरात शं•ार रूपयाने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे़यामुळे आता प्रती व्यक्ती दर्शनासाठी दोनशे,काकड आरती सहाशे तर मध्यान्ह,धुपारती व शेजारतीसाठी चारशे रूपये मोजावे लागणार आहेत़या वाढलेल्या दरामुळे पासेसची संख्या कमी होईल व सामान्य दर्शनातील अडथळे कमी होतील अशी व्यवस्थापनाला अपेक्षा आहे़


सध्या संस्थानच्या आॅन लाईन सर्व्हिसेसच्या माध्यमातुनही अनेक दर्शन व आरती पासेस मिळवत असतात़ शिर्डीत मात्र जनसंपर्क कार्यालया मार्फत व्यक्तीचा विशिष्ठ दर्जा किंवा शिफारस लक्षात घेवुन पासेस देण्यात येत होते़त्यामुळे इच्छा किंवा क्षमता असुनही अनेक पासेस मिळत नसत़आता आॅनलाईन कोट्यातील शिल्लक राहिलेले दर्शन व आरतीचे पासेस संस्थानच्या राहणाऱ्या किंवा प्रसादालयात व्हीआयपी कक्षात घेणाऱ्या कोणत्याही शिफारशी शिवाय देण्याचा महत्वकांक्षी निर्णय ही व्यवस्थापनाने प्रायोगिक तत्वावर घेतला आहे़हे पासेस मिळणार आहेत़यामुळे जनसंपर्क कार्यालयातील गर्दी व ताण कमी होणार आहे़(तालुका प्रतिनिधी)

Web Title: VIPs show great price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.