वीर जवान संदीप जाधव अनंतात विलीन

By admin | Published: June 25, 2017 01:44 AM2017-06-25T01:44:13+5:302017-06-25T01:44:13+5:30

पाकिस्तानी सैन्याशी लढताना धारातीर्थी पडलेले जाँबाज जवान संदीप सर्जेराव जाधव यांना शनिवारी हजारोंच्या जनसागराने साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला

Vir Jawan Sandeep Jadhav merged with Anantas | वीर जवान संदीप जाधव अनंतात विलीन

वीर जवान संदीप जाधव अनंतात विलीन

Next

राम शिनगारे/श्यामकुमार पुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोकुळवाडी (औरंगाबाद) : पाकिस्तानी सैन्याशी लढताना धारातीर्थी पडलेले जाँबाज जवान संदीप सर्जेराव जाधव यांना शनिवारी हजारोंच्या जनसागराने साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला. ‘पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय, हिंदुस्थान जिंदाबाद, संदीप आबा अमर रहे, अमर रहे’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता आणि लष्करातर्फे बंदुकीतून हवेत तीन फैरी झाडून मानवंदना दिल्यानंतर एक वर्षाच्या शिवेंद्रने भडाग्नी दिला, तेव्हा वातावरण स्तब्ध झाले होते. आरोळ्या, किंकाळ्यांनी परिसर दणाणून गेला होता.
जाधव यांचे पार्थिव लष्करी वाहनातून सकाळी केळगाव-गोकुळवाडी या त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. या सुपुत्राला अभिवादन करण्यासाठी गावकऱ्यांनी सर्वत्र श्रद्धांजलीची बॅनर्स लावले होते. केळगावच्या कमानीजवळ पार्थिव पोहोचल्यानंतर गावकऱ्यांनी सजवलेल्या रथामध्ये ठेऊन घरी नेले. त्यानंतर, स्मशानभूमीपर्यंत टाळ, मृदंगाच्या गजरात अंत्ययात्रा काढण्यात आली.
या ठिकाणी विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, आ. अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, मराठा लाइफ इन्फन्ट्रीचे नायब सुभेदार मापारी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह आदींनी पुष्पचक्र अर्पण केले.

पाकिस्तानचा
राष्ट्रध्वज जाळला
पार्थिव दाखल होण्याच्या आगोदर युवकांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देत पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून निषेध केला.
४० हजारांचा जनसमुदाय
पंचक्रोशीसह खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यातून सुमारे ४० हजारांचा जनसमुदाय अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होता. गोकुळवाडी हे २० ते २५ घरांची वस्ती असलेले ठिकाण आहे. त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सुविधा नसल्यामुळे नागरिकांनी दिसेल, त्या पायवाटेने गोकुळवाडी जवळ केले. जिकडे पाहावे, त्या शिवारात चालत येणारी माणसेच माणसे दिसत होती.

Web Title: Vir Jawan Sandeep Jadhav merged with Anantas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.