Virar Hospital Fire : "विरार रुग्णालयातील दुर्घटना ही काही नॅशनल न्यूज नाही"; आरोग्य मंत्र्यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 12:04 PM2021-04-23T12:04:22+5:302021-04-23T12:25:15+5:30
Virar fire incident, not national news says Maharashtra Health Minister Rajesh Tope : रुग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे.
मुंबई - विरारमधील एका रुग्णालयातील कोविड सेंटरला भीषण (Virar Hospital Fire) आग लागली. या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहेत. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयामध्ये ही आग लागली. येथील कोविड सेंटरमध्ये एसीचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. विजय वल्लभ रुग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. याच दरम्यान आता आरोग्य मंत्री राजेश टोपे (Maharashtra Health Minister Rajesh Tope) यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे.
"विरार रुग्णालयातील दुर्घटना ही काही नॅशनल न्यूज नाही" असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. तसेच "आपण रेमडेसिवीरवर बोलू शकतो. ऑक्सिजनबाबत बोलू शकतो. पण विरारची घटना ही काही नॅशनल न्यूज नाही. ही राज्यातील घटना आहे. राज्य सरकार त्यावर सर्वोतोपरी मदत करेल" असं टोपे यांनी म्हटलं आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदींशी ऑक्सिजनसंदर्भात बोलणार आहोत. रेमडेसिवीरसंदर्भात बोलणार आहोत. ही घटना (विरार रुग्णालय आग) ही नॅशनल न्यूज नाही. आम्ही राज्य सरकारच्या वतीने पूर्णपणे मदत करणार आहोत" असं आरोग्य मंत्र्यांनी म्हटलं आहे.
#WATCH Virar fire incident, not national news...says Maharashtra Health Minister Rajesh Tope
— ANI (@ANI) April 23, 2021
13 people have lost their lives in a fire incident at Vijay Vallabh COVID care hospital in Maharashtra's Virar pic.twitter.com/hNZEHIbnLp
राजेश टोपे यांना एका पत्रकाराने 13 जणांचा मृत्यू झाला ही नॅशनल न्यूज नाही का?, असं विचारलं असता यावर उत्तर देताना, "अरे बाबा, राज्य सरकारच्या अंतर्गत आम्ही पूर्ण मदत करणार आहोत. यामध्ये महापालिकेकडून 5 लाखांची, राज्य सरकारकडून पाच लाखांची अशी दहा लाखांची मदत देणार आहोत. नाशिकमधील घटनेप्रमाणेच इथेही मदत दिली जाईल. कोणत्याही इमारतीचे फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट आणि इलेक्ट्रीकल ऑडिट करणं आवश्यक असतं. हे नियम न पाळणाऱ्या आणि त्यासंदर्भात दोषी असणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणात सखोल चौकशी केली जाणार आहे. 10 दिवसांत यासंदर्भात अहवाल सादर केला जाईल. घडलेली घटना दुर्देवी आहे" असं म्हटलं आहे.
In today’s meeting with the PM, we will talk about Oxygen, Remdesivir, an adequate quantity of vaccines for the State...also the Virar fire incident, it is not national news. State govt will provide financial assistance to those affected: Maharashtra Minister Rajesh Tope pic.twitter.com/RclZYd8rXx
— ANI (@ANI) April 23, 2021
भाजपाने ठाकरे सरकारवर (Thackeray Government) निशाणा साधला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी (BJP Kirit Somaiya) यावरून हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. "महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू आहे. ठाकरे सरकारने आता हा प्रतिष्ठेची मुद्दा न बनवता केंद्र सरकार, लष्कराची मदत घ्यावी" असं म्हटलं आहे. तसेच राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे असं देखील ते म्हणाले आहेत. "महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू आहे. ठाकरे सरकारने आता हा प्रतिष्ठेची मुद्दा न बनवता केंद्र सरकार, लष्कराची मदत घ्यावी. महाराष्ट्रातील सर्व कोविड केंद्रामधील ऑक्सिजन आणि फायर ऑडिट तातडीने करण्यात यावं. यासाठी या श्रेत्रातील तज्ज्ञांची मदत घेण्यात यावी. तसेच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे" असं मत किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलं आहे.
Virar Hospital Fire : "ठाकरे सरकारने आता प्रतिष्ठेचा मुद्दा न बनवता केंद्र सरकार, लष्कराची मदत घ्यावी"https://t.co/LkVwUr3Xqk#coronavirusinmaharashtra#VirarFire#BJP#KiritSomaiya#ThackerayGovernment#RajeshTope@KiritSomaiyapic.twitter.com/wSpKugZD6n
— Lokmat (@MiLOKMAT) April 23, 2021