औरंगाबादमध्ये बहुजन क्रांतीचा विराट मूकमोर्चा
By Admin | Published: November 4, 2016 01:25 PM2016-11-04T13:25:04+5:302016-11-04T15:09:34+5:30
क्रांती चौकातून बहुजन क्रांती मूकमोर्चाला सुरुवात झाली आहे. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात भीमसैनिकांनी सहभाग घेतल्याने या मोर्चाला विराट स्वरुप झाले आहे.
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 4 - क्रांती चौकातून बहुजन क्रांती मूकमोर्चाला सुरुवात झाली आहे. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात भीमसैनिकांनी सहभाग घेतल्याने या मोर्चाला विराट स्वरुप झाले आहे. अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करावा, कोपर्डीसह सर्व बलात्कार प्रकरणांतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, यांसह प्रमुख मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोर्चामध्ये रिपब्लिकन नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, शिवसेनेचे आमदार संजय शिरसाटदेखील सहभागी झाले होते. तसंच महिलांचानीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे.
जिल्हाधिका-यांकडे मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर जालन रोडवर या मोर्चाची सांगता करण्यात येणार आहे. दरम्यान, मराठा समाजाकडून काढण्यात येणा-या मूक मोर्चांना हा प्रतीमोर्चा नाही, हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.