औरंगाबादेत मुस्लिमांचा विराट मूक मोर्चा

By Admin | Published: January 7, 2017 05:29 AM2017-01-07T05:29:32+5:302017-01-07T05:29:32+5:30

मुस्लीम समाजाला १५ टक्के आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसाठी शुक्रवारी औरंगाबादेत विराट मूक मोर्चा काढण्यात आला.

The Virat Muk Front of Muslims in Aurangabad | औरंगाबादेत मुस्लिमांचा विराट मूक मोर्चा

औरंगाबादेत मुस्लिमांचा विराट मूक मोर्चा

googlenewsNext


औरंगाबाद- मुस्लीम समाजाला १५ टक्के आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसाठी शुक्रवारी औरंगाबादेत विराट मूक मोर्चा काढण्यात आला. तीन लाखांहून अधिक नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. मोर्चात मुस्लीम बांधवांच्या एकजुटीचे आणि शिस्तीचे दर्शन घडले.
सकाळपासून अनेक वसाहतींमध्ये मोर्चाची जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसून आले. दुपारी १२ वाजेपासून ऐतिहासिक जामा मशिदीकडे जाणारे सर्वच रस्ते गर्दीने फुलले होते. सहा हजारांहून अधिक स्वयंसेवक नेमण्यात आले होते. या मोर्चासाठी शहरातील सर्वच मशिदींमध्ये एकाच वेळी नमाज ठेवण्यात आली होती. दुपारी १ ते १.१५पर्यंत शुक्रवारची विशेष नमाज अदा करण्यात आली. जामा मशिदीमध्ये दुपारी १.४५ वाजता शुक्रवारची नमाज पढण्यात आली. त्यानंतर नागरिक आमखास मैदानावर दाखल झाले. मैदानात महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

Web Title: The Virat Muk Front of Muslims in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.