वीरेंद्र तावडेच्या जामीन अर्जावर ३० रोजी निकाल; पानसरे हत्येप्रकरणी सरकारचा युक्तिवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 11:54 PM2018-01-20T23:54:32+5:302018-01-20T23:54:51+5:30

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे हत्येचा कट सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक संशयित डॉ. वीरेंद्र तावडे यानेच रचला आहे. त्याच्याविरोधात तपास यंत्रणेकडे भक्कम पुरावे आहेत. त्यामुळे तोच या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी केला.

Virender Tawde's bail application on 30; The government's argument for the murder of Pansare | वीरेंद्र तावडेच्या जामीन अर्जावर ३० रोजी निकाल; पानसरे हत्येप्रकरणी सरकारचा युक्तिवाद

वीरेंद्र तावडेच्या जामीन अर्जावर ३० रोजी निकाल; पानसरे हत्येप्रकरणी सरकारचा युक्तिवाद

Next

कोल्हापूर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे हत्येचा कट सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक संशयित डॉ. वीरेंद्र तावडे यानेच रचला आहे. त्याच्याविरोधात तपास यंत्रणेकडे भक्कम पुरावे आहेत. त्यामुळे तोच या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी केला.
शनिवारी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात तावडेच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली.
गेले दोन दिवस ही सुनावणी होती. दोन्ही बाजंूचा युक्तिवाद ऐकून ३० जानेवारीला निकाल देण्यात येईल, असे बिले यांनी स्पष्ट केले.
संशयित तावडेविरोधात नोंदविलेले साक्षीदारांचे महत्त्वपूर्ण जबाब एस.आय.टी.कडे आहेत आणि नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी पुणे येथील न्यायालयाने तावडेचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे तावडेला पानसरे हत्या प्रकरणात जामीन देऊ नये, अशी विनंती अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी या वेळी केली.
एखाद्या व्यक्तीला आरोपी करायचे आणि त्याच्याविरोधात खोटे पुरावे गोळा करून त्याला आरोपीच्या पिंजºयात उभे करायचे, तसे तपास यंत्रणेने तावडे याच्याबाबतीत केले आहे.
त्याला या प्रकरणात जाणूनबुजून अडकविण्यात आले आहे, असा युक्तिवाद तावडेचे वकील अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी केला.

निंबाळकर-पटवर्धन यांच्यात शाब्दिक चकमक
दाभोलकर, पानसरे व एम.एम. कलबुर्गी हत्या प्रकरणांमध्ये साम्य आहे, असा मुद्दा सरकारी वकील अ‍ॅड. हर्षद निंबाळकर हे युक्तिवादावेळी मांडत होते. याला आक्षेप घेत पानसरे हत्या प्रकरणात कलबुर्गी हत्येचा संबंध आणू नका, असे अ‍ॅड. पटवर्धन यांनी सांगितले. यावरून निंबाळकर व पटवर्धन यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यावर ‘सुनावणी सुरू ठेवायची की पुढील तारीख देऊ?’ असे न्यायाधीशांनी दोघांनाही सुनावले.

Web Title: Virender Tawde's bail application on 30; The government's argument for the murder of Pansare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.