वीरेंद्र तावडेच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
By admin | Published: July 19, 2016 04:48 AM2016-07-19T04:48:08+5:302016-07-19T04:48:08+5:30
सनातनचा साधक डॉ. वीरेंद्र तावडे याच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. बी. गुळवे-पाटील यांनी सोमवारी दिला
पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या कटातील मुख्य सूत्रधार सनातनचा साधक डॉ. वीरेंद्र तावडे याच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. बी. गुळवे-पाटील यांनी सोमवारी दिला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे येरवडा कारागृहातून तो सुनावणीला उपस्थित होता.
या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविल्यानंतर तावडेला गेल्या महिन्यात अटक झाली.२१ जूनला सीबीआय कोठडी संपल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली़ त्याच दिवशी कोल्हापूर पोलिसांनी दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्यांमध्ये साधर्म्य असल्याचे सांगून तावडेचा ताबा द्यावा, असा विनंतीअर्ज पुणे न्यायालयात केला़ न्यायालयाने परवानगीही दिली होती़ यावेळी आरोपीच्या वकिलांनी आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करावी व त्यानंतर हस्तांतराची प्रक्रिया सुुरु करावी, अशी विनंती केली होती़ त्यानुसार तावडे याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली़