घोटाळेबाज विशाल फटेला अटक; कुटुंबासह आत्महत्येचा विचार येत असल्याचा यू ट्युबद्वारे दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 10:23 AM2022-01-18T10:23:33+5:302022-01-18T10:23:53+5:30
सोमवारी सायंकाळी विशाल फटे सोलापूर ग्रामीण पोलिस मुख्यालयात शरण आला. पोलिसांनी त्याला अटक केली असून, वैद्यकीय तपासणीसाठी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोलापूर : बार्शी येथील कोट्यवधींच्या गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी मुख्य सूत्रधार विशाल फटे याला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून, मंगळवारी त्याला बार्शी न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक (सोलापूर ग्रामीण) तेजस्वी सातपुते यांनी दिली.
सोमवारी सायंकाळी विशाल फटे सोलापूर ग्रामीण पोलिस मुख्यालयात शरण आला. पोलिसांनी त्याला अटक केली असून, वैद्यकीय तपासणीसाठी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरण येताना तो एकटाच होता, त्याची मुले आणि पत्नी सोबत नसल्याचेही सांगण्यात आले.
तत्पूर्वी सकाळी यू ट्युबवरून आपण सायंकाळी पोलिसांसमोर हजर राहणार असल्याचे विशाल फटे याने सांगितले होते. मागील दोन दिवसांत बायको, मुलासह आत्महत्येचा विचार आला होता. आपण समर्पण करणार असून, मिळेल ती शिक्षा भोगण्यास तयार असल्याचे त्याने म्हटले हाेते.
हा २०० कोटींचा घोटाळा नसून जास्तीत जास्त १० कोटी रुपये मला लोकांचे द्यायचे आहेत. मला कुणाचे पैसे बुडवायचे नव्हते आणि नाहीत. आपण सर्वांचे पैसे देणार आहोत. - विशाल फटे, आरोपी