विष्णू नारायण भातखंडे जन्मदिन

By admin | Published: August 10, 2016 08:49 AM2016-08-10T08:49:42+5:302016-08-10T08:50:09+5:30

हिंदुस्तानी संगीताचे संशोधक, संगीतकार, गायक विष्णू भातखंडे यांची आज (१० ऑगस्ट) जयंती

Vishnu Narayan Bhatkhande Birthday | विष्णू नारायण भातखंडे जन्मदिन

विष्णू नारायण भातखंडे जन्मदिन

Next
>प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. १० - हिंदुस्तानी संगीताचे संशोधक, संगीतकार, गायक विष्णू भातखंडे यांची आज (१० ऑगस्ट) जयंती. त्यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या वर्गीकरणाची थाट पद्धत विकसवली.
 
जीवन
भातखंड्यांचा जन्म ऑगस्ट १०, १८६०  रोजी  जन्माष्टमीच्या दिवशी मुंबईत वाळकेश्वरात झाला. त्यांचे शिक्षण मुंबईचे एलफिन्स्टन कॉलेज  व  पुण्याच्या डेक्कन कॉलेजात झाले. इ.स. १८८५ साली ते कायद्याचे पदवीधर झाले व इ.स. १८८७ सालापासून वकिली करू लागले. पुढे काही काळ कराचीच्या उच्च न्यायालयात त्यांनी वकिली केली.
 
भातखंड्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांत वल्लभदास नावाच्या सतारवादकाकडून  सतार  शिकायला आरंभ केला. पुढे रावजीबा नावाच्या ध्रुपद गायकाकडून ते गायकी शिकू लागले. गायकी व हिंदुस्तानी संगीताच्या इतर पैलूंबाबत त्यांना बेलबागकर, अली हुसेन खाँ, विलायत हुसेन खाँ यांचेही मार्गदर्शन लाभले.
 
पत्नी व मुलीच्या निधनानंतर भातखंड्यांनी वकिली सोडून पूर्णपणे संगीताभ्यासाला वाहून घेतले. त्यांनी भरताच्या नाट्यशास्त्राचा आणि संगीत रत्नाकर या प्राचीन भारतीय संगीतविषयक ग्रंथाचा अभ्यास चालवला होताच; पण आता त्यांनी हिंदुस्तानी संगीतातील विस्कळीत वैविध्याला पद्धतशीर सैद्धांतिक चौकटीत बसवण्याकरता प्रयत्न केले. त्यातूनच त्यांनी राग, रागिण्या आणि पुत्ररागांमध्ये वर्गीकरण करण्याच्या जुन्या पद्धतीऐवजी 'थाट पद्धत' नावाची नवी वर्गीकरण पद्धत हिंदुस्तानी संगीताकरता विकसवली.
 
निधन
उतारवयात भातखंडे पक्षाघात व मांडीच्या अस्थिभंगामुळे अंथरूणास खिळून होते. सप्टेंबर १९, १९३६ रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांचे निधन झाले.
 
सौजन्य : मराठी विकिपीडिया 
 

Web Title: Vishnu Narayan Bhatkhande Birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.