विश्व हिंदू परिषदेचे व्यकंटेश आबदेव यांचे दीर्घ आजाराने पुण्यात निधन 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 03:00 PM2019-05-28T15:00:11+5:302019-05-28T15:05:30+5:30

प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेचे पूर्ण वेळ काम करीत होते.

Vishwa Hindu Parishad's Vyanankesh Abdev died in Pune due to a prolonged illness | विश्व हिंदू परिषदेचे व्यकंटेश आबदेव यांचे दीर्घ आजाराने पुण्यात निधन 

विश्व हिंदू परिषदेचे व्यकंटेश आबदेव यांचे दीर्घ आजाराने पुण्यात निधन 

googlenewsNext
ठळक मुद्देदहा दिवसांपूर्वी आबदेव आजारी पडल्याने राव रुग्णालयात दाखल विश्व हिंदू परिषदेचे काम ते गेली ३० वर्षांपासून काम

पुणे: पुण्यात कात्रज येथे मुलाकडे राहत असलेले विश्व हिंदू परिषदेचे सचिव व्यंकटेश नारायण आबदेव यांचे सोमवारी( दि.२७) रात्री साडेदहा वाजता पुण्यात राव हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने प्राणज्योत मालवली. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी दोघे ही विवाहित असा परिवार आहे. आबदेव यांच्या पार्थिवावर मंगळवारी ( आज ) सायंकाळी ५ वाजता नवी पेठ वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यविधी संस्करा करण्यात येणार आहे. 
आबदेव हे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेचे पूर्ण वेळ काम करीत होते. सध्या ते पुण्यात कात्रज येथील गुजरवाडी येथे मुलाकडे राहत होते. ते मूळचे मुरुड जंजिरा येथील होते. दहा दिवसांपूर्वी आबदेव आजारी पडल्याने त्यांना राव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विश्व हिंदू परिषदेचे काम ते गेली ३० वर्षांपासून काम करत होते. त्यामुळे ते दिल्लीत वास्तव्याला होते. दोन वर्षांपूर्वी राजस्थानमधील जयपूर येथे पॅरॅलिस चा झटका आला होता.त्यातून बरे झाल्यावर त्यांना पुण्यात घरी आणले होते. 

Web Title: Vishwa Hindu Parishad's Vyanankesh Abdev died in Pune due to a prolonged illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे