विश्वनाथन आनंद यांना हृदयनाथ जीवन गौरव
By admin | Published: April 13, 2016 02:17 AM2016-04-13T02:17:23+5:302016-04-13T02:17:23+5:30
हृदयेश आर्ट्स या संस्थेतर्फे दिला जाणारा हृदयनाथ जीवन गौरव पुरस्कार आंतरराष्ट्रीय बुद्धीबळपटू ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांना राज्यपाल विद्यसागर राव यांच्या हस्ते मंगळवारी देण्यात आला.
मुंबई : हृदयेश आर्ट्स या संस्थेतर्फे दिला जाणारा हृदयनाथ जीवन
गौरव पुरस्कार आंतरराष्ट्रीय बुद्धीबळपटू ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांना राज्यपाल विद्यसागर राव यांच्या हस्ते मंगळवारी देण्यात
आला. दोन लाख रुपये, स्मृतिचिन्ह व पगडी असे या सन्मानाचे स्वरूप
आहे.
दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाला पंडित हृदयनाथ मंगेशकर, अभिनेता आमीर खान, रघुनंदन गोखले, रवी अभ्यंकर, हृदयेश आर्ट्सचे अध्यक्ष अविनाश प्रभावळकर, आमदार पराग अळवणी आदी उपस्थित होते.
विश्वनाथन आनंद यांनी महाराष्ट्राला आपले दुसरे घर मानावे किंवा वर्षातून एक पंधरवडा महाराष्ट्रात येऊन येथील युवा व होतकरू बुद्धिबळपटूंना मार्गदर्शन करावे, अशी आग्रहाची सूचना राज्यपालांनी केली.
महाराष्ट्राविषयी बोलताना आनंद यांनी आपण पहिली राष्ट्रीय स्पर्धा मुंबईत जिंकली होती तसेच पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन झाल्यावर राज्यपालांच्या बंगल्यावर आपला सत्कार झाला होता, अशी आठवण सांगितली. महाराष्ट्राने प्रेम दिले, असे म्हणत या पुरस्कारासाठी महाराष्ट्राचे आभारही त्यांनी मानले. (प्रतिनिधी)