मोबाईलग्रस्त वाहनचालकांना यमाचे दर्शन

By Admin | Published: May 14, 2017 12:39 AM2017-05-14T00:39:58+5:302017-05-14T00:39:58+5:30

पोलिसांकडून सुरू असलेल्या वेगवेगळ्या उपाययोजनांमध्ये ‘सेल्फी विथ यमराज’ या आगळ्या प्रयोगाची शनिवारी फर्ग्युसन महाविद्यालयाजवळील चौकात सुरुवात झाली

Visible to mobile-operated drivers | मोबाईलग्रस्त वाहनचालकांना यमाचे दर्शन

मोबाईलग्रस्त वाहनचालकांना यमाचे दर्शन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या वेगवेगळ्या उपाययोजनांमध्ये ‘सेल्फी विथ यमराज’ या आगळ्या प्रयोगाची शनिवारी फर्ग्युसन महाविद्यालयाजवळील चौकात सुरुवात झाली. मोबाईलवर बोलत धोकादायकपणे वाहन चालविणाऱ्यांना थांबवून वाहतूक पोलिसांनी थेट यमाचे दर्शन घडवून मरणाची जाणीव करून दिली.
यम ही मृत्यूदेवता मानली जाते. प्रामुख्याने वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे हा नियमभंग करणाऱ्यांना थांबवून यमराजाच्या रुपात असलेल्या कलाकारासोबत सेल्फी काढण्यात आला. दुपारी १२ पर्यंत ही मोहीम सुरू होती.
मान आणि कानाच्यादरम्यान मोबाईल धरून बोलणाऱ्या किंवा चारचाकी चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्या संबंधितांना यमराजाचे दर्शन घडविण्यात आले. पुन्हा नियमभंग करणार नाही, अशी शपथ घ्यावयास सांगण्यात आले. नियमभंग करणाऱ्यांपैकी काही जणांना आपण केलेल्या चुकीची जाणीव झाली.
अशोक मोराळे म्हणाले, की सुरक्षित वाहतुकीबाबत केल्या जाणाऱ्या उपाययोजनांपैकी सेल्फी विथ यमराज हा उपक्रम होता. मोबाईलवर बोलत गेल्यास
वास्तवात यमराजाचे दर्शन
होऊ शकते, याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न होता.
मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण बरेच वाढले आहे. त्या पाशर््वभूमीवर गुडलक हॉटेलजवळील गोपाळकृष्ण गोखले चौकाजवळ सकाळी १० वाजता या विशेष मोहिमेस सुरुवात झाली. वाहतूक शाखेचे उपायुक्त अशोक मोराळे, सहायक आयुक्त जयश्री गायकवाड, महेश सरतापे, डेक्कन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि लायन्स क्लबचे पदाधिकारी सहभागी झाले होते. पहिल्या तासाभरात २० जणांना यमराजासोबत सेल्फी काढायला लावण्यात आले. अप्पा आखाडे यांनी यमराजाची वेशभूषा करून पोलिसांना सहकार्य केले.

Web Title: Visible to mobile-operated drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.