नाशिकच्या दृष्टीहीन वेदांतचे नेत्रदिपक यश : बारावीमध्ये ९० टक्के

By admin | Published: May 30, 2017 05:45 PM2017-05-30T17:45:38+5:302017-05-30T17:45:38+5:30

नाशिकच्या वेदांत मुंदडा या दृष्टिबाधित विद्यार्थ्याने दहावीप्रमाणे बारावीच्या परिक्षेतही ९०.३१ टक्के

The visionary achievement of the visionary Vedanta in Nashik: 90% in HSC | नाशिकच्या दृष्टीहीन वेदांतचे नेत्रदिपक यश : बारावीमध्ये ९० टक्के

नाशिकच्या दृष्टीहीन वेदांतचे नेत्रदिपक यश : बारावीमध्ये ९० टक्के

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : डोळस विद्यार्थ्यांनाही लाजवेल अशाप्रकारे सातत्याने शैक्षणिक क्रिडा, संगीत अशा सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडी घेतलेल्या नाशिकच्या वेदांत मुंदडा या दृष्टिबाधित विद्यार्थ्याने दहावीप्रमाणे बारावीच्या परिक्षेतही ९०.३१ टक्के गूण मिळवित नेत्रदिपक कामगिरी केली आहे. तो दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये राज्यात आघाडीवर आहे.
केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर वेदांत हा संगीत, कला, क्रिडामध्येही आघाडीवर आहे. नियतीने वेदांत दीड वर्षांचा असताना त्याची दृष्टी हिरावून घेतली; मात्र त्याला अष्टपैलू कामगिरीसाठी लागणारे सर्व काही कलागूण उपजत दिले. त्याने आपल्या बुध्दीमत्तेच्या जोरावर चमकदार कामगिरी करून नेहमीच नेत्रदिपक डोळस विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली आहे. जिद्द, आत्मविश्वास आणि पालकांच्या दमदार पाठिंब्यामुळे आपल्या व्यंगावर मात करीत अभ्यासापासून खेळापर्यंत नैपुण्य मिळविले आहे. वेदांतला तबला विशारद व सनदी अधिकारी होण्याची इच्छा आहे. त्याने तबला वाजविण्याचे चोख धडे घेत पाच परिक्षाही उत्तीर्ण केल्या आहेत. खुल्या मैदानात आणि घराच्या आवारात पालकांच्या देखरेखीखाली वेदांत सायकल, दुचाकीदेखील चालवितो एवढेच नव्हे तर संगणकापासून तर बुध्दीबळ अन् क्रिकेटसारख्या खेळांमध्येही तो आपले कौशल्य दाखवून देतो.

Web Title: The visionary achievement of the visionary Vedanta in Nashik: 90% in HSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.