जिओ ग्राहकांची माहिती चोरीला

By admin | Published: July 13, 2017 05:14 AM2017-07-13T05:14:58+5:302017-07-13T05:14:58+5:30

जिओ ग्राहकांची माहिती चोरीला गेल्याची तक्रार रिलायन्सतर्फे पोलिसांकडे करण्यात आली आहे.

Visit the customer's information stolen | जिओ ग्राहकांची माहिती चोरीला

जिओ ग्राहकांची माहिती चोरीला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : जिओ ग्राहकांची माहिती चोरीला गेल्याची तक्रार रिलायन्सतर्फे पोलिसांकडे करण्यात आली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर महाराष्ट्र सायबर सेल व नवी मुंबई सायबर सेलने जयपूर येथून इमरान चिपा याला अटक केली असून तो संगणकतज्ज्ञ आहे.
रिलायन्सच्या जिओ ग्राहकांची संपूर्ण माहिती मॅजिका संकेतस्थळावर ग्राहकांच्या नंबरवरून सहज उपलब्ध होती. ही बाब निदर्शनास आल्यानंतर ग्राहकांची गोपनीय माहिती चोरीला गेल्याची तक्रार रिलायन्स जिओ कंपनीने रबाळे पोलिसांकडे केली. त्यानुसार पुढील तपासाकरिता हा गुन्हा सायबर सेलकडे वर्ग झाल्यानंतर महाराष्ट्र व नवी मुंबई सायबर सेलने कसून केलेल्या तपासादरम्यान जिओच्या संकेतस्थळावरून माहिती चोरलेल्या संगणकाचा आयपी अ‍ॅड्रेस मिळाला. त्याद्वारे पोलिसांनी शोध घेतल्यावर तो संगणक जयपूरमधील सुजानगढ येथील इमरान चिपाच्या घरचा असल्याचे उघड झाले. त्यानुसार स्थानिक पोलिसांच्या मदतीने महाराष्ट्र सायबर सेल व नवी मुंबई सायबर सेलच्या पथकाने त्याला अटक केली आहे. बुधवारी सकाळी नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने जयपूरहून त्याला ताब्यात घेतले. इमरानने जिओ ग्राहकांचा डेटा चोरून मॅजिका संकेतस्थळासाठी पुरवल्याची शक्यता आहे. मात्र, त्यामागचा उद्देश व त्याला मोबदला काय मिळाला? याबाबत माहिती उघड झालेली नाही. याप्रकरणी नवी मुंबई सायबर क्राइम पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Visit the customer's information stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.