जायफळापासून वेदनाशामक औषधाची निर्मिती

By Admin | Published: October 4, 2016 08:49 AM2016-10-04T08:49:33+5:302016-10-04T08:50:21+5:30

इगतपुरी तालुक्यातील प्राचार्य डॉ. योगेश उशीर आणि डॉ. सुदर्शन सिंग यांनी जायफळापासून वेदनाशामक औषधाची निर्मिती केली आहे.

Vitamin A | जायफळापासून वेदनाशामक औषधाची निर्मिती

जायफळापासून वेदनाशामक औषधाची निर्मिती

googlenewsNext

लक्ष्मण सोनवणे, ऑनलाइन लोकमत

बेलगाव कुऱ्हे (नाशिक), दि. ४ -  मनुष्य जन्माला येतो तेव्हापासून अनेक छोट्या मोठ्या आजारांचा प्रतिकार त्याला करावा लागतो. त्यातच काही भयानक आजारांवर गोरगरिबांना आर्थिक झळ ही अजिबात परवडणारी नसते. गरीब रुग्णांमध्ये ईश्वराचे अस्तित्व समजणाऱ्या एका प्राचार्यांना आरोग्यवर्धक जायफळापासून एका विशेष संशोधनातून वेदनाशामक औषधाची निर्मिती करण्यास मोठे यश मिळाले आहे.
इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील एसएमबीटी डी फार्मसी सेवाभावी ट्रस्टमधील प्राचार्य डॉ. योगेश विष्णुपंत उशीर आणि डॉ. सुदर्शन सिंग यांनी विद्यार्थ्यांना डॉक्टरकीचे शिक्षण देताना फावल्या वेळात त्यांनी ‘टॉपिकल जेल फॉर्म्युलेशन आॅफ टायमेटिन’ या विषयावर पेटंटची नोंदणी करून दोन वर्षांच्या अथक परिश्रमातून वेदनाशामक या परिपूर्ण औषधाची यशस्वीरीत्या निर्मिती केली आहे. त्यांनी शोधलेले टायमेटीनचे मलम हे औषध अनेक आजारांवर रामबाण व गुणकारी ठरले आहे. या महत्त्वाच्या औषधाची सहज उपलब्धता, सोपी निर्मितीपद्धती आणि वापरण्यास सोईस्कर असल्याने आरोग्यक्षेत्रातील विविध थरांतून त्यांचे कौतुक केले जात आहे.
डॉ. उशीर व डॉ. सिंग औषधनिर्माण क्षेत्रात अनेक वर्षांपासून संशोधन करत आहेत. या संशोधनात त्यांना असे आढळून आले की, दैनंदिन जीवनात वापरात येणाऱ्या आणि निसर्गातून सहज उपलब्ध होणाऱ्या जायफळात ‘टायमेटिन’ हा घटक आहे आणि तो शरीरातील वेदना, चमक तसेच सुजही कमी करतो. जायफळातील टायमेटीन विलग करून त्याचे जेल फॉर्म्युलेशन अर्थात मलम बनविल्याने रु ग्णांना सहजतेने वापरता येऊ शकते आणि कमीत कमी दरात सर्वसामान्यांना उपलब्धही होऊ शकते. या त्यांच्या रु ग्णांप्रति आत्मीयतेतून त्यांनी पुढील तपासणी केली. संशोधनात्मक तपासणीनंतर सकारात्मक परिणाम दिसून आले. त्यांनी विलग केलेले टायमेटिन जलद गतीने त्वचेद्वारे रक्तात प्रवेश करते आणि लवकरात लवकर शरीरातील चमक किंवा वेदना शमवते. तसेच शरीरावरील सुजही कमी करते. या औषधाचे शरीरावर घातक परिणाम होत नाहीत, असे निकष त्यांनी केलेल्या विस्तारपूर्वक संशोधनातून समोर आले आहेत. दि. २० जून २०१६ रोजी भारतीय पेटंट कार्यालयात नोंद केलेल्या या शोधाचा पेटंट क्र मांक आयएन 201621021529/ एमयूएम असा आहे. तालुक्यातील धामणगाव येथील एसएमबीटी इन्स्टिट्यूट आॅफ डी फार्मसीमधून केलेले हे संशोधन व पहिले यशस्वी पेटंट अनेक रु ग्णांसाठी वरदान ठरले आहे. सदर विषयावर त्यांचे गेल्या दोन वर्षापासून निरंतर संशोधन सुरू होते. आगळ्यावेगळ्या जायफळाच्या वेदनाशामक औषध निर्मितीमुळे आर्थिक दुर्बल घटकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या संशोधनाला जिद्द व आत्मविश्वासाने अखेर अथक परिश्रमातून त्यांच्या मेहनतीला फळ मिळाले आहे.


औषधनिर्माणशास्त्रज्ञ म्हणून सर्वसामान्यांच्या आरोग्याचा विचार करणे ही मी माझी नैतिक जबाबदारी मानतो. येत्या काळात भयानक आजारांपासून रु ग्णांना वाचविण्यासाठी सोईस्कर तसेच अधिक गुणकारी औषधे कशी बनवता येतील यावर पुढील संशोधनात आमचा भर असेल जेणेकरून सर्व थरांतील रु ग्णांना मदत व्हावी. -डॉ. योगेश उशीर, प्राचार्य

 

Web Title: Vitamin A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.