विठ्ठल मंदिर, परिसराची आधुनिक यंत्रांद्वारे स्वच्छता
By admin | Published: June 27, 2017 01:47 AM2017-06-27T01:47:51+5:302017-06-27T01:47:51+5:30
आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरीत मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यांना मूलभूत सुविधा देण्याबरोबरच
लोकमत न्यूज नेटवर्क
पंढरपूर : आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरीत मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यांना मूलभूत सुविधा देण्याबरोबरच तेथील स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. यासाठी प्रथमच आधुनिक यंत्रांद्वारे मंदिर व परिसराची स्वच्छता केली जाणार असल्याची माहिती जि़ प़ मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वच्छता समन्वयक डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली.
मंदिर समिती व भारत विकास ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने तुकाराम भवन येथे कर्मचाऱ्यांना आधुनिक यंत्राद्वारे स्वच्छता करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी डॉ. विजय देशमुख, व्यवस्थापक विलास महाजन, गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे, भारत विकास ग्रुपचे सूरज महाजन उपस्थित होते.