विठ्ठल मंदिरात भक्ताला पुजाऱ्याकडून मारहाण
By admin | Published: May 18, 2017 01:57 AM2017-05-18T01:57:16+5:302017-05-18T01:57:16+5:30
दर्शनाची आस मनी घेऊन आलेल्या भाविकाला पांडुरंगाला हार का घातला, अशी विचारणा करीत मंदिरातील पुजाऱ्याने मारहाण केली़ अशोक नारायण बंडगे असे पुजाऱ्याचे नाव आहे.
- लोकमत न्यूज नेटवर्क
पंढरपूर (सोलापूर) : दर्शनाची आस मनी घेऊन आलेल्या भाविकाला पांडुरंगाला हार का घातला, अशी विचारणा करीत मंदिरातील पुजाऱ्याने मारहाण केली़ अशोक नारायण बंडगे असे पुजाऱ्याचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय बन्सी सुसे (४५, रा. आमरापूर, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) हे भाविक पहाटे विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचले. त्यांनी पांडुरंगाला हार घातला़ तेव्हा पुजारी बंडगे यांनी त्यांना रोखले. यानंतर भाविक व पुजाऱ्यामध्ये वाद झाला. या वादादरम्यान पुजाऱ्याने दत्तात्रय सुसे यांना मारहाण केली. सुसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा केला आहे. या घटनेचीही गंभीर दखल मंदिर समितीने घेतली घेतली असून कारवाई केली जाईल, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन यांनी दिली.
विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तीला हार घालू नये. यासंदर्भात मंदिर परिसरात जागोजागी सूचना फलक लावले आहेत. जे व्हीआयपी येतात, तेही मूर्तीला हार घालत नाहीत़ भाविकांनी मूर्तीचे संरक्षण केले पाहिजे. भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठ्या श्रध्देने पंढरपुरात येतात. त्यांना कर्मचाऱ्यांनीही अशी वागणूक देऊ नये. भाविकाला मारहाण करणाऱ्या पुजाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे़
- संजय तेली,कार्यकारी अधिकारी, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती