विठ्ठला, जरा कर अंतर कमी!
By Admin | Published: June 25, 2014 01:12 AM2014-06-25T01:12:18+5:302014-06-25T01:12:18+5:30
रथावर बसलेल्या लोकांचा सहन न होणारा भार.. अन् गर्दीमुळे श्वास घेताना होणारा त्रस त्यामुळे मंगळवारी संत तुकाराम महाराज पालखी सोहळय़ातील रथाच्या बैलांचे हाल झाले. ‘
>अभिजित कोळपे
- यवत (जि़ पुणो)
डांबरी रस्त्यावरून चालताना सतत पाय सटकणो.. रथावर बसलेल्या लोकांचा सहन न होणारा भार.. अन् गर्दीमुळे श्वास घेताना होणारा त्रस त्यामुळे मंगळवारी संत तुकाराम महाराज पालखी सोहळय़ातील रथाच्या बैलांचे हाल झाले. ‘विठ्ठला भार अन् अंतर कर रे कमी’ अशीच आर्त हाक बळीराजाने दिली असेल. त्यामुळे रथावर बसणा:यांची संख्या तरी कमी करा किंवा अंतर कमी करून मुक्कामाचे दोन दिवस वाढवा, अशी विनंती बैल जोडी मालकांनी सोहळा प्रमुखांकडे केली आहे.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मंगळवारी सकाळी लोणी काळभोर वरून मार्गस्थ झाला. रात्रीचा मुकाम यवतला आहे. त्यामुळे लोणी ते यवतचा सुमारे 27 किलोमीटरचे अंतर बैलांसाठी मोठे होते. पालखी सोहळय़ातील इतर टप्पे लहान आहेत. हा आणि वरवंड ते उंडवडी (28 किलोमीटर) टप्पा सर्वात मोठा आहे. त्यामुळे या ठिकाणी बैलांचे हाल होणार आहेत. दरम्यान, लोणी काळभोरच्या ग्रामस्थांचा पाहुणचार घेऊन पालखी पहिल्या विश्रंतीसाठी कुंजीरवाडी, तर दुपारच्या मुक्कामासाठी सव्वाएकच्या दरम्यान उरूळी कांचन येथे आली. या वेळी रस्त्याच्या दुतर्फा पालखी रथावर ग्रामस्थांनी भक्तिभावाने फुलांचा वर्षाव करून स्वागत केले.
डोळे आकाशाकडे
वारीच्या वाटेवर अंतर कापताना लक्ष खाली.. अन् डोळे आकाशाकडे असे भाव अनेक वारक:यांच्या चेह:यावर दिसत होते. अहमदनगर जिलतील कर्जत तालुक्यातून आलेल्या एका वारक:याने सांगितले, की पाऊस झाला नसल्याने अनेक जण वारीत दाखल झाले नाहीत. अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून पेरण्या पूर्ण झाल्यावर ही संख्या निश्चितच वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
उद्याचा मुक्काम वरवंडला
बुधवारी सकाळी सातच्या दरम्यान पालखी यवतहून मार्गस्थ होणार असून, भांडगाव, केडगाव-चौफुला येथे विसावा घेऊन रात्रीच्या मुक्कामासाठी वरवंडला येणार आहे.
शासकीय यंत्रणा हायटेक
च्आराध्य दैवत असणा:या कानडय़ा विठुरायाची आषाढी यात्र अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पंढरपूर तालुक्यात पालख्यांनी प्रवेश केल्यानंतर कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली आहे. तर यावर्षी प्रथमच पंचायत समितीची यंत्रणा हायटेक करण्यात आली असून, वॉकीटॉकीच्या माध्यमातून भाविकांना सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत.