आरोपी स्थानिक आमदार सुनील भुसारा यांचा निकटवर्तीय, म्हणून पोलिसांवर दबाव आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 09:15 PM2021-08-26T21:15:59+5:302021-08-26T21:17:56+5:30

आरोपी हा स्थानिक आमदार सुनील भुसारा यांचा निकटवर्तीय असल्याने पोलिसांवर दबाव आहे का? असा सवाल ही विवेक पंडित यांनी उपस्थित केला आहे.

vivek pandit asked the accused is close to local mla Sunil Bhusara so is there pressure on the police | आरोपी स्थानिक आमदार सुनील भुसारा यांचा निकटवर्तीय, म्हणून पोलिसांवर दबाव आहे का?

आरोपी स्थानिक आमदार सुनील भुसारा यांचा निकटवर्तीय, म्हणून पोलिसांवर दबाव आहे का?

Next

पालघर: मोखाडा येथील काळू पवार ह्या आदिवासी कामगाराच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर पोलिसां कडून वेठबिगारीचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतरही पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे ह्यांनी जिल्ह्यात कुठेही वेठबिगारी नसल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते.ह्यावर आज श्रमजीवीचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित ह्यांनी पत्रकार परिषद घेत जिल्ह्यात वेठबिगारी पद्धत नाही असे जाहीर करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांचा आहे पोलिसांना नाही असे सांगून आरोपी हा स्थानिक आमदार सुनील भुसारा यांचा निकटवर्तीय असल्याने पोलिसांवर दबाव आहे का? असा सवाल ही विवेक पंडित यांनी उपस्थित केला आहे.

मोखाडा येथील काळू पवार या शेतमजुराने वेठबिगारीतून केवळ ५०० रुपयांसाठी आत्महत्या केल्याच्या प्रकरणी पोलिस अधीक्षकांनी केलेल्या वक्तव्यावर राज्य स्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष, तथा, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक  विवेक पंडित यांनी मनोर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत संतप्त प्रतिक्रिया दिली. पालघर जिल्ह्यात वेठबिगारी किंवा इतर अनिष्ट प्रकार नाहीत हे पोलीस अधीक्षकांचे वक्तव्य दुर्दैवी असे म्हणत, गुन्ह्यांवर पांघरून घालण्यासारखे वक्तव्य करण्याचा अधिकार पोलिसांना दिला कोणी ? असा सवाल विवेक पंडित यांनी उपस्थित केला आहे.  तसेच मालक वर्गाने मजुरांना आगावू रक्कम (बयाना)देऊ नये, अन्यथा वेठबिगारी विरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल होतील असा इशारा देखील त्यांनी ह्यावेळी दिला.

पालघर जिल्ह्यात वेठबिगारी किंवा इतर अनिष्ट प्रकार नसल्याचे पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी दिनांक २४ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. यावेळी त्यांनी बाळू पवार यांनी आत्महत्या केली त्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असल्याने त्यांच्या गावातच दफनविधी केल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली. पवार याला नेहमी दारू पिण्याची सवय होती आणि  २ ऑगस्ट रोजी या आत्महत्या विषयी मोखाडा पोलिसांना प्रथम माहिती प्राप्त झाली असता मृताच्या पत्नीने कोणत्याही प्रकारचा संशय व्यक्त केला नसल्याचे पोलीस अधीक्षकांचे म्हणणे खोडून काढीत मृत पवार याची पत्नी सावित्री पवार हिने आपल्या जबाबात आपला मुलगा दत्तूच्या अंतिम संस्कार करण्यासाठी पवार कुटुंबियांकडे पैसे नव्हते. शेवटी गावातील रामदास कोरडे या मालकाकडून कफन खरेदीसाठी ५०० रुपयाची उसनवारी केली हे पैसे कसे फेडायचे याबाबत विचारले असता, शेतीच्या कामावर येऊन फेडावे लागतील असे मालकाने सांगितल्याचे व त्याप्रमाणे तो गडी  म्हणून काम करत होता असे मृत कळूच्या पत्नीने आपल्या तक्रारी दरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटल्याची माहिती विवेक पंडित ह्यांनी दिली.त्यामुळे या प्रकरणी गुन्ह्याचा तपास सुरू असताना  पोलीस अधीक्षक यांनी आहे प्रकारचे वक्तव्य करणे म्हणजे, गुन्ह्यांवर पांघरून घालण्याचा प्रकार आहे असे  पंडित यांनी म्हटले आहे.

पालघर जिल्ह्यात वेठबिगारी किंवा इतर अनिष्ट प्रकार नाहीत हे पोलीस अधीक्षकांचे वक्तव्य दुर्दैवी असून गुन्ह्यांवर पांघरून घालण्यासारखे वक्तव्य करण्याचा अधिकार पोलिसांना दिला कोणी ? असा सवाल  विवेक पंडित यांची उपस्थित केला आहे. तसेच,आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नेता असून, स्थानिक आमदार सुनील भुसारा यांचा निकटवर्तीय आहे. म्हणून पोलिसांवर दबाव आहे का?असाही प्रश्न  विवेक पंडित यांनी उपस्थित केला आहे.या पत्रकार परिषदेला मृत काळू पवार यांची पत्नी सावित्री काळू पवार आणि दोन मुली देखील उपस्थित होत्या.
 

Web Title: vivek pandit asked the accused is close to local mla Sunil Bhusara so is there pressure on the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.