ऑडिओ क्लिपमधील आवाज पूजाचा नाही, पूजाच्या वडिलांचा दावा, बदनामी थांबविण्याचे केले आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 06:36 AM2021-02-15T06:36:21+5:302021-02-15T06:36:48+5:30

Pooja Chavan Suicide Case: परळी शहरातील देशमुख पार येथे पूजा चव्हाण आपल्या आई वडिलांसह राहत होती. तिच्या वडिलांचे परळीपासून जवळच असलेल्या वसंतनगर तांडा येथे पोल्ट्री फार्म आहे.

The voice in the audio clip is not of Pooja, Pooja's father claims, appeals to stop defamation | ऑडिओ क्लिपमधील आवाज पूजाचा नाही, पूजाच्या वडिलांचा दावा, बदनामी थांबविण्याचे केले आवाहन

ऑडिओ क्लिपमधील आवाज पूजाचा नाही, पूजाच्या वडिलांचा दावा, बदनामी थांबविण्याचे केले आवाहन

Next

परळी (जि. बीड) : पूजा चव्हाणआत्महत्याप्रकरणात तिचे वडील लहू चव्हाण यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. पूजाच्या आत्महत्येसंदर्भात ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत, त्यातील आवाज पूजाचा नाही. पूजाच्या मृत्यूप्रकरणी आपली कोणाविरोधातही तक्रार नाही, कुणाविषयी शंका नाही. त्यामुळे आमची आणि समाजाची बदनामी करून आम्हाला वेदना देऊ नका, अशी विनंती लहू चव्हाण यांनी केली. या प्रकरणात ज्यांचे नाव जोडले जात आहे, ते मंत्री संजय राठोड हे पूजाच्या वडिलांसारखे आहेत, असे ते ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले. 
परळी शहरातील देशमुख पार येथे पूजा चव्हाण आपल्या आई वडिलांसह राहत होती. तिच्या वडिलांचे परळीपासून जवळच असलेल्या वसंतनगर तांडा येथे पोल्ट्री फार्म आहे. गेल्या तीन वर्षांपासून पूजानेही स्वतः पोल्ट्री फार्म उघडला होता. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून त्यात नुकसान झाले, त्याचा ताण पूजावर होता, असे लहू चव्हाण यांनी सांगितले. 
आठ दिवसांपूर्वी ती पुण्याला गेली होती. तिला मोठे व्हायचे होते. परंतु अचानक तिचा मृत्यू झाला. याबाबत आपली कुणाविषयी शंका नाही, कोणाला दोष द्यायचा नाही, तिच्या मृत्यूमुळे आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे, असेही ते म्हणाले. 
पूजाला पाच बहिणी आहेत. पूजा ही सर्वात कणखर होती. आमच्या कुटुंबाचा तीच आधार होती, असे सांगत लहू चव्हाण यांनी माध्यमांद्वारे पूजाची होत असलेली बदनामी थांबविण्याचे आवाहन केले. कर्जाचा ताण घेऊ नको, आपण कर्ज घेऊ असे तिला समजावून सांगितले होते, असेही ते म्हणाले.  
बंजारा समाज कोर्टात जात नाही. एखाद्या प्रकरणाचा निर्णय मुख्य नाईक घेतात. तसेच पूजाच्या मृत्यूप्रकरणी जे सत्य बाहेर येईल ते सर्वांना मान्य असेल, असेही (पान १० वर)

पोलिसांवर दबाव
नागपूर : या प्रकरणातील ‘ऑडिओ क्लिप्स’ एकदम स्पष्ट आहेत. त्यातील आवाज कुणाचा आहे, हेदेखील सर्वांना माहिती आहे. मात्र पोलिसांनी गंभीरतेने कारवाई केलेली नाही. पोलिसांवर कुठला तरी मोठा दबाव आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

दोषारोप करणे योग्य नाही - थोरात
या प्रकरणात चौकशी होईल, असे खुद्द मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. त्यामुळे तोवर  यासंदर्भात कुणावरही दोषारोप करणे योग्य नाही, असा दावा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.

Read in English

Web Title: The voice in the audio clip is not of Pooja, Pooja's father claims, appeals to stop defamation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.