आवाजावरून होणार तक्रारीची नोंद

By admin | Published: January 17, 2015 05:44 AM2015-01-17T05:44:40+5:302015-01-17T05:44:40+5:30

कोकण रेल्वेमार्गावर प्रवाशांच्या तक्रारी आता त्यांच्या आवाजावरून नोंद होणार आहेत. यासाठी कोकण रेल्वेकडून १८00२६६५७२५ हा टोल फ्री क्रमांक

The voice will be reported from the voice | आवाजावरून होणार तक्रारीची नोंद

आवाजावरून होणार तक्रारीची नोंद

Next

मुंबई : कोकण रेल्वेमार्गावर प्रवाशांच्या तक्रारी आता त्यांच्या आवाजावरून नोंद होणार आहेत. यासाठी कोकण रेल्वेकडून १८00२६६५७२५ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे. या टोल फ्री क्रमांकाचे नुकतेच रेल्वेमंत्र्यांकडून उद्घाटन केले आहे.
प्रवासात कुठलीही तक्रार प्रवाशाला करायची झाल्यास कोकण रेल्वेकडून याआधीच एक ९00४४७0७00 हा एसएमएस तक्रार क्रमांक उपलब्ध केला आहे. ज्यावर प्रवासी सेवेविषयी त्यांच्या तक्रारी एसएमएस करू शकतात. त्याचप्रमाणे या तक्रारींची आणखी वेगळ्या प्रकारे नोंद होऊ शकते का यासाठीही कोकण रेल्वेकडून विचार केला जात होता. त्यानुसार १८00२६६५७२५ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध केल्याचे कोकण रेल्वेने सांगितले. नंबर डायल केल्यावर प्रवासी तक्रार नोंद करू शकतात. त्यानंतर एक आॅडिओ फाईल तयार होईल त्याची दखल कोकण रेल्वे अधिकाऱ्यांकडून घेतली जाईल. तक्रारीचे निवारण झाल्यावर त्याचे उत्तर एसएमएसद्वारे दिले जाऊ शकते. (प्रतिनिधी)

Web Title: The voice will be reported from the voice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.