तक्रार निवारण्यासाठी पंचायत समिती स्तरावरही ‘व्हॉटस अॅप’ क्रमांक !
By Admin | Published: March 2, 2017 06:15 PM2017-03-02T18:15:43+5:302017-03-02T18:15:43+5:30
तक्रारींचे निवारण करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात आता पंचायत समिती स्तरावरही ‘व्हॉटस अॅप’ क्रमांक उपलब्ध करून दिला जात आहे.
वाशिम, 02 : ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात आता पंचायत समिती स्तरावरही ह्यव्हॉटस अॅपह्ण क्रमांक उपलब्ध करून दिला जात आहे. पंचायत समितीच्या कक्षेतील संबंधित समस्यांबाबत या क्रमांकावर तक्रार नोंदविता येणार आहे.
ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेमार्फत पंचायत समितीच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात. गावपातळीवर ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र, पशुवैद्यकीय केंद्र, लघु सिंचन विभागाचे जलप्रकल्प, पाणीपुरवठा योजना, वैयक्तिक लाभाच्या विविध योजना आदींसंदर्भात नागरिकांना नानाविध गैरसोयींना सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही समस्या किंवा तक्रारीचे निवारण झाले नाही तर संबंधित लाभार्थीला नाईलाजाने जिल्हा परिषदेचे संबंधित विभाग प्रमुख किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन द्यावे लागते. यामध्ये वेळ व पैशाचा अपव्यय होत आहे. नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी यापूर्वी जिल्हा परिषदेने जिल्हास्तरावर ह्यव्हॉट्स अॅपह्ण क्रमांक उपलब्ध करून दिलेला आहे. सुरूवातीला या क्रमांकावर नागरिकांनी तक्रारीही नोंदविल्या. त्यानंतर या क्रमांकावर तक्रारींचा ओघ कमी झाला. ही बाब लक्षात घेऊन आता पंचायत समिती स्तरावर तक्रार निवारणासाठी स्वतंत्र ह्यव्हॉटस अॅपह्ण क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. ह्यव्हॉटस अॅपह्ण क्रमांकावरील प्राप्त तक्रारींची नोंद करणे आणि सदर तक्रार संबंधित विभाग प्रमुखाकडे वळती करण्याची जबाबदारीही कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
शौचालय व घरकुल योजनेचे अनुदान, जिल्हा परिषद कृषी विभागाच्या योजना यासह ग्रामपंचायत व पंचायत समितीशी संबंधित एखाद्या प्रलंबित कामांची तक्रार नोंदविता येणार आहे. या तक्रारींचे निराकरण संबंधित विभाग प्रमुखांकडून केले जाणार आहे. गावपातळीवरील शाळा, आरोग्य केंद्र, समाजकल्याण विभागाचे वसतिगृह, पशू दवाखाना, ग्रामसेवक, शिक्षक यासह जिल्हा परिषदेच्या अन्य कर्मचाऱ्यांनी दांडी मारली असेल तर नागरिकांना याबाबतची तक्रार या क्रमांकावर नोंदविता येणार आहे. यासाठी संबंधितांना स्वत:च्या नावाचा उल्लेख करावा लागणार आहे.