बँकांच्या वाढत्या सेवा शुल्काविषयी मत मांडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2017 01:45 AM2017-05-14T01:45:33+5:302017-05-14T01:45:33+5:30

‘कॅशलेस’कडे वळताना व्यवहारांकडे वळताना आता दुसऱ्या बाजूला बँकांनी आपले सेवा शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला

Vote on the increasing service fees of banks | बँकांच्या वाढत्या सेवा शुल्काविषयी मत मांडा

बँकांच्या वाढत्या सेवा शुल्काविषयी मत मांडा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नोटाबंदीनंतर सर्वत्र ‘कॅशलेस’ चे वारे वाहू लागले. मात्र ‘कॅशलेस’कडे वळताना व्यवहारांकडे वळताना आता दुसऱ्या बाजूला
बँकांनी आपले सेवा शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या सगळ््या प्रकरणांत सामान्यांची ओढाताण होताना दिसतेय. या पार्श्वभूमीवर सामान्यांची बँकांच्या वाढत्या सेवा शुल्काविषयी नेमकी काय भावना आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न मुंबई ग्राहक पंचायतीने केला आहे.
मुंबई ग्राहक पंचायतीने बँकांच्या वाढत्या सेवा शुल्काविषयी आॅनलाईन सर्व्हेक्षण हाती घेतले असून या माध्यमातून सामान्यांची मते जाणून घेण्यात येतील. ग्राहकांच्या न्यायाविषयी आग्रही असणाऱ्या ग्राहक पंचायतीने या सर्वेक्षणाच्या माध्यमातून सामान्यांना होणारा मनस्ताप अहवालाद्वारे संबंधित यंत्रणांपर्यत पोहोचविण्याचा निर्धार केला असल्याचे ग्राहक पंचायतीच्या वर्षा राऊत यांनी सांगितले.
आॅनलाईन सर्वेक्षणात
बँकेचे व्यवहार करण्याची पद्धत, व्यवहारांवर लागणारे सेवा
शुल्क, व्यवहाराची मुदत संपल्यानंतरचा दंड, खात्यातील कमाल-किमान रक्कम, सेवा
शुल्क वाढीमागील कारणे, अन्य ठिकाणी देण्यात येणाऱ्या सेवा शुल्काविषयीची माहिती अशा विविध मुद्द्यांवर ग्राहकांची मते नोंदविण्यात येत आहेत.

Web Title: Vote on the increasing service fees of banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.