लग्न पत्रिकेतील आहेरात मागितले नरेंद्र मोदींना मत 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 12:40 PM2019-03-14T12:40:34+5:302019-03-14T12:45:37+5:30

सांगलीतील एका कुटुंबाने हा आनंदाचा सोहळा साजरा करत असताना चक्क लग्नपत्रिकेमध्ये ‘नरेंद्र मोदी यांना मत हाच आमचा आहेर’ असे नमूद करत अनोखी शक्कल लढवली आहे. ही पत्रिका सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड होत असून नेटिझन्सचे लक्ष वेधून घेत आहे.

'Vote for Modi' message by marriage invitation card | लग्न पत्रिकेतील आहेरात मागितले नरेंद्र मोदींना मत 

लग्न पत्रिकेतील आहेरात मागितले नरेंद्र मोदींना मत 

Next

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : विवाह हा दोन व्यक्ती आणि दोन कुटुंबांच्या जीवनातील अनमोल क्षण! लग्नपत्रिका देखणी, आकर्षक करण्याचा उत्साह प्रत्येक घरामध्ये पहायला मिळतो. सांगलीतील एका कुटुंबाने हा आनंदाचा सोहळा साजरा करत असताना चक्क लग्नपत्रिकेमध्येनरेंद्र मोदी यांना मत हाच आमचा आहेर’ असे नमूद करत अनोखी शक्कल लढवली आहे. ही पत्रिका सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड होत असून नेटिझन्सचे लक्ष वेधून घेत आहे.

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. त्यादृष्टीने राजकीय पक्षांच्याही जोरदार हालचाली सुरु आहेत. सामान्य नागरिकही आपल्या बाजूने या प्रवाहात सामील झाले आहेत. सांगलीमधील एका कुटुंबाने चक्क लग्नपत्रिकेच्या शेवटी ‘नरेंद्र मोदी यांना मत हाच आमचा आहेर’ असे आवाहन करत अनोखी शक्कल लढवली आहे.

जयवंत खोत यांचे चिरंजीव प्रशांत आणि चंद्रकांत चव्हाण यांची कन्या स्रेहल यांचा विवाह ३१ मार्च रोजी सांगलीमध्ये पार पडणार आहे. लग्नपत्रिकेमध्ये वधू-वरांच्या वैवाहिक आयुष्याला शुभेच्छा देण्यात आल्या असून, ‘व्होट फॉर मोदी- नरेंद्र मोदी यांना मत हाच आमचा आहेर’, असा अनोखा संदेश छापण्यात आला आहे.

याबाबत ‘लोकमत’शी बोलताना वराचे भाऊ प्रसाद खोत म्हणाले, ‘चांगल्या राज्यकर्त्यांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे. सामान्य लोक राजकारणापासून कायम चार हात लांब राहणे पसंत करतात. त्यांच्यामध्ये राजकारण, निवडणुका, चांगले शासन याबाबत जागरुकता वाढली पाहिजे, असा विचार करुन लग्नपत्रिकेमध्ये हा संदेश लिहिला आहे. मला नंदूरबार, पुणे, सोलापूर अशा विविध भागांतून अभिनंदनाचे फोन आले. मात्र, कालपासून काहींनी फोन करुन या संदेशामुळे आचारसंहितेचा भंग होऊन कारवाई होऊ शकेल, असे सांगितले. मात्र, लग्नपत्रिका आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी छापण्यात आली आहे. याबाबत  निवडणूक अधिका-यांनाही कल्पना देणार आहे. पत्रिका केवळ पै-पाहुणे, मित्रपरिवारापुरती मर्यादित राहील असे वाटले होते. मात्र, ती मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर फिरत आहे.’

Web Title: 'Vote for Modi' message by marriage invitation card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.