मतदारांनो, गाफील राहू नका!

By admin | Published: October 14, 2014 01:15 AM2014-10-14T01:15:59+5:302014-10-14T01:15:59+5:30

मतदारांनी गाफील न राहता महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी आपले नाव मतदारयादीत खरोखरच आहे याची खात्री करावी, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.

Voters, do not be cowardly! | मतदारांनो, गाफील राहू नका!

मतदारांनो, गाफील राहू नका!

Next
मुंबई : गेल्या निवडणुकीत मतदान केले होते किंवा माङयाकडे मतदार ओळखपत्र आहे म्हणजे माङो नाव मतदारयादीत असणारच असा समज करून घेऊन मतदारांनी गाफील न राहता महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी आपले नाव मतदारयादीत खरोखरच आहे याची खात्री करावी, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी मतदारयाद्या अद्ययावत करण्यात आल्या आहेत. ज्यांच्या वयाला 1 जानेवारी 2क्14 रोजी किंवा तत्पूर्वी 18 वर्षे पूर्ण झाली आहेत असे सर्व मतदार आगामी निवडणुकीत मतदान पात्र असतील. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदारांची नावे याद्यांमधून मोठय़ा संख्येने वगळली गेल्याच्या तक्रारी झाल्यानंतर आयोगाने जून महिन्यापासून राज्यात मतदार नोंदणीची विशेष व्यापक मोहीम घेतली होती. 
 
92 टक्के मतदारांना ओळखपत्रे
महाराष्ट्रात यादीत नोंदलेल्या एकूण मतदारांपैकी 92.4क् टक्के मतदारांना मतदार ओळखपत्रे दिली गेली आहेत, असे निवडणूक आयोगाचे म्हणणो आहे. तसेच निवडणुकीत मतदारांची छायाचित्रे असलेल्या मतदारयाद्या उपयोगात आणल्या जाणार आहेत. राज्यात याद्यांमध्ये 91 टक्के मतदारांची छायाचित्रेही उपलब्ध आहेत. 
 
मतदार स्लिप घरोघरी  
मतदारांना मतदारयादीतील त्यांचा क्रमांक, नाव, मतदान केंद्राचे नाव आणि पत्ता आणि मतदानाची तारीख व वेळ इत्यादी तपशील असलेली छापील स्लिप निवडणूक यंत्रणोकडून घरी आणून देण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. याखेरीज प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर, मतदानाच्या दिवशी, उघडण्यात येणा:या बूथवरही मतदारांना माहिती व मार्गदर्शन मिळू शकेल.
‘नोटा’चा पर्याय उपलब्ध
लोकसभा निवडणुकीप्रमाणो येत्या विधानसभा निवडणुकीतही मतदारांना, निवडणूक लढवीत असलेल्या उमेदवारांपैकी कोणालाही मत द्यायचे नाही, अशी नोंद करण्याचा पर्याय (नन ऑफ दि अबव्ह-नोटा) मतदान यंत्रंवर उपलब्ध असेल. यासाठी मतदान यंत्रवर निवडणूक लढविणा:या उमेदवारांच्या शेवटच्या नावानंतर ‘नोटा’ अशी पट्टिका असेल. त्यासमोरील बटण दाबून मतदार आपला ‘नोटा’चे मत नोंदवू शकतील.

 

Web Title: Voters, do not be cowardly!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.