मतदारराजा जागा झाला!

By admin | Published: February 22, 2017 05:21 AM2017-02-22T05:21:43+5:302017-02-22T05:21:43+5:30

अत्यंत चुरशीने लढले गेलेल्या राज्यातील १० महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी

The voters got the place! | मतदारराजा जागा झाला!

मतदारराजा जागा झाला!

Next

मुंबई : अत्यंत चुरशीने लढले गेलेल्या राज्यातील १० महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सरासरी ५६.३० तर ११ जिल्हा परिषदा आणि ११८ पंचायत समित्यांसाठी सरासरी ७० टक्के मतदान झाले. शहरी भागांपेक्षा ग्रामीण मतदारांनी अधिक मतदान केले. शहरांपेक्षा ग्रामीण मतदारांचा अधिक प्रतिसाद दिसून आला. उन्हाचा पारा चढलेला असतानाही त्याची तमा न बाळगता अक्षरश: रांगा लावून नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिकेत २०१२ च्या तुलनेत मतदान तब्बल ११ टक्क्यांनी वाढल्याने त्याचा फायदा कोणाला होणार या बाबत कमालीची उत्सुकता आहे. निकाल २३ फेबु्रवारी रोजी जाहीर होणार आहे.
दहा महापालिकांच्या मागील निवडणुकांत सरासरी ५२ टक्के ; तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांत सरासरी ६८.९९ टक्के मतदान झाले होते.
प्राथमिक अंदाजानुसार महापालिकानिहाय मतदानाची टक्केवारी अशी: बृहन्मुंबई ५५, ठाणे- ५८, उल्हासनगर- ४५, पुणे- ५४, पिंपरी-चिंचवड- ६७, सोलापूर- ६०, नाशिक- ६०, अकोला- ५६, अमरावती- ५५ आणि नागपूर- ५३. एकूण सरासरी- ५६.३०.
प्राथमिक अंदाजानुसार जिल्हा परिषदनिहाय (पंचायत समित्यांसह) मतदानाची टक्केवारी अशी: रायगड- ७१, रत्नागिरी- ६४, सिंधुदुर्ग- ७०, नाशिक- ६८, पुणे- ७०, सातारा- ७०, सांगली- ६५, सोलापूर- ६८, कोल्हापूर- ७०, अमरावती- ६७ आणि गडचिरोली- ६८. सरासरी- ७०.
मतदान यंत्राची पूजा!
पुण्यात माजी महापौर चंचला कोदे, उपमहापौर गायकवाड यांनी केली एव्हीएम मशीन ची पूजा केली.पुण्यातील प्रभाग
क्र मांक २२ येथे राजकीय पक्षांच्या नेते, कार्यकर्त्यांनी एव्हीएम मशिनची आरतीचे ताट घेऊन साग्रसंगीत पूजा केली. या प्रकाराच्या चौकशीचे आदेश निवडणुक निर्णय अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी दिले.
पैसे वाटताना तेरा ताब्यात
सोलापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप करताना राष्ट्रवादी क ाँग्रेसच्या तेरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन ६७ हजार १०० रुपयांची रोकड जप्त केली. मंगळवेढा परिसरात मतदारांना पैसे वाटप करण्यात येत होते.
पोलीस नाईक विनोद साठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नानासाहेब ज्ञानोबा कदम, सीताराम उत्तम
कदम, संतोष मुरलीधर हजारे, बाबा महादेव हजारे, मच्छिंद्र किसन हजारे, अशोक बापू कदम, शहाजी भगवान गोडसे, गजानन मधुकर कदम, सचिन शांताराम कदम, नवनाथ संदिपान थोरात, नानासाहेब तुकाराम गोडसे, शिवाजी दादू धांडोरे, विठ्ठल दिगंबर कदम (सर्व रा. शिंगोर्णी, ता. माळशिरस) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

चार मतांनंतरच बिपचा आवाज

चार प्रभागांमुळे काही मतदारांचा गोंधळ उडाला होता. व्होटींग मशिनवर एक बटन दाबल्यानंतर मतदान झाल्याचा आवाज येत नसल्याने काही मतदार संभ्रमीत झाले. चवथे बटन दाबल्यावरच सर्व मते पडून मतदान केल्याचा बिप ऐकू येत असल्याचे स्पष्ट झाले. हा आवाज येत होता. त्यामुळे मत देण्यासाठी गेलेला मतदार फार वेळ घेतांना दिसत होता.

Web Title: The voters got the place!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.