महाराष्ट्रात 23 एप्रिलला 'या' 14 मतदारसंघांमध्ये मतदान!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 08:24 PM2019-03-10T20:24:48+5:302019-03-10T20:30:37+5:30
महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार आहे. पैकी तिसऱ्या टप्प्यामध्ये एकूण 14 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.
मुंबई - केंद्रीय निवडणूक आयोगाने 17 व्या लोकसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार देशात सात टप्प्यात मतदान होणार आहे. 11 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीचा पहिला तर 19 मे रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होईल. तर 23 मे रोजी मतमोजणी होईल.
दरम्यान, महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार आहे. पैकी तिसऱ्या टप्प्यामध्ये एकूण 14 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. 23 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
तिसऱ्या टप्प्यात मतदान होणारे मतदारसंघ
मतदानाची तारीख 23 एप्रिल
मतदारसंघ - जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले.