राज्यात ७५०० ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरु; शिंदे गट-ठाकरे गटाची प्रतिष्ठा पणाला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 09:22 AM2022-12-18T09:22:30+5:302022-12-18T09:22:48+5:30

 विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे.

Voting begins for 7500 Gram Panchayats in the state; The prestige of the Shinde group-Thakrey group was at stake | राज्यात ७५०० ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरु; शिंदे गट-ठाकरे गटाची प्रतिष्ठा पणाला

राज्यात ७५०० ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरु; शिंदे गट-ठाकरे गटाची प्रतिष्ठा पणाला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आठवडाभरापासून धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा शुक्रवारी थंडावल्या आहेत. आता प्रतीक्षा प्रत्यक्ष मतदानाची असून रविवारी  विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकांसाठी मतदान सुरु झाले आहे.

या ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल.  २० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

जिल्हा व तालुकानिहाय ग्रामपंचायती
अहमदनगर- २०३, अकोला- २६६, अमरावती- २५७, औरंगाबाद- २१९, बीड- ७०४, भंडारा- ३६३, बुलडाणा- २७९, चंद्रपूर- ५९, धुळे- १२८, गडचिरोली- २७, गोंदिया- ३४८, हिंगोली- ६२, जळगाव- १४०, जालना- २६६, कोल्हापूर- ४७५, लातूर- ३५१, नागपूर- २३७, नंदुरबार- १२३, उस्मानाबाद- १६६, पालघर- ६३, परभणी- १२८, पुणे- २२१, रायगड- २४०, रत्नागिरी- २२२, सांगली- ४५२, सातारा- ३१९, सिंधुदुर्ग- ३२५, सोलापूर- १८९, ठाणे- ४२, वर्धा- ११३, वाशिम- २८७, यवतमाळ- १००, नांदेड- १८१ व नाशिक- १९६. एकूण- ७७५१.

Web Title: Voting begins for 7500 Gram Panchayats in the state; The prestige of the Shinde group-Thakrey group was at stake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.