बिगुल वाजलं! राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 05:19 PM2023-10-03T17:19:37+5:302023-10-03T17:46:06+5:30

5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 06 नोव्हेंबर 2023 रोजी होईल.

Voting for 2 thousand 359 gram panchayats in the state on November 5 | बिगुल वाजलं! राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान

बिगुल वाजलं! राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान

googlenewsNext

मुंबई -  राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदाच्या तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.  

मदान यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्रे 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 ऑक्टोबर 2023 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 25 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.

5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 06 नोव्हेंबर 2023 रोजी होईल. मात्र गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तेथे 7 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होईल.

Web Title: Voting for 2 thousand 359 gram panchayats in the state on November 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.