ग्रामपंचायतींसाठी १६ ऑक्टोबरला हाेणार मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 06:08 AM2022-09-27T06:08:03+5:302022-09-27T06:08:26+5:30

राज्य निवडणूक आयोगाची माहिती.

Voting for gram panchayats will be held on October 16 | ग्रामपंचायतींसाठी १६ ऑक्टोबरला हाेणार मतदान

ग्रामपंचायतींसाठी १६ ऑक्टोबरला हाेणार मतदान

googlenewsNext

मुंबई : विविध १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १,१६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान होईल. मतमोजणी १४ ऑक्टोबरऐवजी आता १७ ऑक्टोबरला होईल, अशी माहिती राज्य  निवडणूक आयोगाने दिली.

आयोगाने ७ सप्टेंबरला १,१६५  ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदाचाही समावेश आहे. सुधारित कार्यक्रमानुसार, १६ ऑक्टोबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल.  

नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी १७ ऑक्टोबरला मतमोजणीचे ठिकाण व वेळ संबंधित तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने निश्चित करतील.

Web Title: Voting for gram panchayats will be held on October 16

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.