राज्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायतींचा आज फैसला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 06:05 AM2022-12-20T06:05:03+5:302022-12-20T06:06:24+5:30

राज्यभरातील ७ हजार १३५ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले.

voting result of Election 7135 Gram Panchayats in the state today | राज्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायतींचा आज फैसला

राज्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायतींचा आज फैसला

googlenewsNext

मुंबई : राज्यभरातील ७ हजार १३५ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. ७४ टक्क्यांपर्यंत मतदानाची आकडेवारी गेली असून, सदस्यांसह थेट सरपंचांची निवड करणाऱ्या या निवडणुकीचा निकाल आज (मंगळवार) लागणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या, तर काही ठिकाणी सदस्यपदांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. 

यामुळे ७ हजार १३५ ग्रामपंचायतींसाठी मतदानाची प्रक्रिया रविवारी शांततेत पार पडली.सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होणार असून, दुपारपर्यंत सर्व निकाल स्पष्ट होतील. ग्रामपंचायतीची निवडणूक कोणत्याही राजकीय  पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नसली तरी निकालानंतर सर्वच पक्षांकडून आपला उमेदवार विजयी झाल्याचा दावा केला जात असल्याने या दाव्यांत कुठला पक्ष प्रबळ ठरतो याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

Web Title: voting result of Election 7135 Gram Panchayats in the state today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.