शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी उद्या मतदान

By admin | Published: February 2, 2017 07:55 PM2017-02-02T19:55:59+5:302017-02-02T19:55:59+5:30

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी शुक्रवार ३ फेब्रुवारीला मतदार होणार आहे.

Voting tomorrow for teacher constituency elections | शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी उद्या मतदान

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी उद्या मतदान

Next

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 2 - नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी शुक्रवार ३ फेब्रुवारीला मतदार होणार आहे. नागपूर विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची संपूर्ण तयारी झालेली आहे. मतदानासाठी विभागात १२४ मतदान
केंद्र निश्चित करण्यात आले असून यासाठी ६८० अधिकरी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ३५,००९ शिक्षक मतदार मतदानाचा हक्क बजावतील. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. मतदानासाठी जांभळ्या रंगाचा विशेष पेन असून, मतदानाच्या वेळी मतदाराच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटावर शाई लावण्यात येणार आहे. तसेच मतदारांना मतदानासाठी प्रशासनाकडून जांभळ्या रंगाच्या शाईचा विशेष पेन पुरविण्यात येणार आहे. मतदान नोंदणीसाठी याा विशेष पेनाचा उपयोग करायचा आहे. इतर पेनचा उपयोग केल्यास मतदान अवैध ठरणार आहे.

- सेंट ऊर्सुला शाळेत होणार मतमोजणी
६ फेब्रुवारी रोजी सेंट ऊसुर्ला शाळेत मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यापूर्वी ५ फेब्रुवारी रोजी सेंट ऊर्सुला गर्ल्स हायस्कुल येथे कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होईल.

- व्ही. एम. पाटील निवडणूक निरीक्षक
नागपूर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी एम.ए.डी.सी.चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक व्ही.एम. पाटील यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय विभागीय आयुक्त अनूप कुमार हे निवडणूक निर्णय अधिकारी राहतील. तर जिल्हाधिकारी सचिन कुर्वे (नागपूर), जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी (भंडारा), जिल्हाधिकारी आशुतोष सलील (चंद्रपूर), जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे (गोंदिया), जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक (गडचिरोली) आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल (वर्धा) हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राहतील.

असे आहेत उमेदवार
अनिल दिनकरराव शिन्दे, चंद्र्रपूर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), प्रकाश भगवंतराव जाधव, कन्हान (पारशिवनी) (शिवसेना), अरुण उर्फ रविंद्रदादा महादेवराव डोंगरदेव (बळीराजा पार्टी), राजेंद्र्र बाबुराव झाडे (शिक्षकभारती), आनंदराव येंकय्याजी अंगलवार, चंद्रपूर (अपक्ष), आनंदराव गोविंदराव कारेमोरे (विमाशि), खेमराज परसराम कोंडे, सुरगाव (उमरेड)
(अपक्ष), प्रेम हरिदास गजभिये (अपक्ष), नागोराव पुंडलिक गाणार (महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद), चंद्रकांत गोहणे पाटील, नागपूर (अपक्ष), अजहर शफीउल्ला पठाण, नागपूर (अपक्ष), विलास शंकरराव बल्लमवार, गडचिरोली (अपक्ष), शेषराव नारायण बिजवार (अपक्ष), संजय चिंतामण बोंदरे (अपक्ष), अशोक वासुदेवराव लांजेवार (अपक्ष), अरुण निळकंठ हर्षबोधी (अपक्ष).


एकूण १४ ओळखपत्रे ग्राह्य
शिक्षक मतदारसंघ मतदानासाठी मतदारांना मतदान केंद्र्रावर भारत निवडणूक आयोगाच्या छायाचित्र मतदार ओळखपत्राशिवाय इतर १३ ओळखपत्रे मतदान करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. यात पारपत्र, वाहन परवाना, पॅन
कार्ड, पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र, शासकीय / निमशासकीय / सार्वजनिक उपक्रम विभागाचे सेवा ओळखपत्र तसेच यापुढील छायाचित्र असलेले बँक पासबूक, नोंदणीकृत दस्त, शिधापत्रीका, जातीचे प्रमाणपत्र, शस्त्र परवाना, अपंगत्वाचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, एनपीआर अंतर्गत असलेले ओळखपत्र यांचा समावेश आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी शिक्षक मतदारसंघ तथा विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी कळविले आहे.

जिल्हानिहाय मतदार व मतदान केंद्र
-------------------------------------------------------------
जिल्हा मतदार पुरुष महिला मतदान केंद्र
नागपूर : १४,९७४ ८४१६ ६५५८ ४३
भंडारा : ३,७२१ २८४२ ८७९ १२
चंद्रपूर : ५६३८ ४३१० १३२८ २७
वर्धा : ४२७९ २९४८ ११३१ १४
गोंदिया : ३३२१ २६९७ ६२४ १०
गडचिरोली : ३०७६ २६२५ ४५१ १८
---------------------------------------------------------------
एकूण : ३५,००९ २३,८३८ १११७१ १२४
----------------------------------------------------------------

Web Title: Voting tomorrow for teacher constituency elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.