मतदानापुरती भुजबळांची सुटका

By admin | Published: July 4, 2017 05:45 AM2017-07-04T05:45:26+5:302017-07-04T05:45:26+5:30

महाराष्ट्र सदन घोटाळा व अन्य ११ घोटाळ्यांत आरोपी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना, राष्ट्रपती निवडणुकीसाठी

Voting of voting Bhujbal | मतदानापुरती भुजबळांची सुटका

मतदानापुरती भुजबळांची सुटका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळा व अन्य ११ घोटाळ्यांत आरोपी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना, राष्ट्रपती निवडणुकीसाठी १७ जुलै रोजी मतदान करण्याची परवानगी विशेष पीएलएमए (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉड्रिंग अ‍ॅक्ट) न्यायालयाने सोमवारी दिली. दीड वर्षानंतर भुजबळ कारागृहाबाहेर येणार आहेत. यापूर्वी तब्येत ठीक नसल्याने, त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.
छगन भुजबळ सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. १७ जुलैला विधिमंडळात होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदानाची परवानगी मिळावी, यासाठी भुजबळांनी विशेष न्यायालयात अर्ज केला. या अर्जाला सक्तवसुली संचालनालयाचे वकील हितेन वेणेगावकर यांनी विरोध केला.
पीएमएलए कायद्याच्या कलम ४४ नुसार आरोपीला घटनेच्या अनुच्छेद ५४ अंतर्गत मिळणाऱ्या घटनात्मक अधिकाराबद्दल आदेश देण्याचा अधिकार विशेष कोर्टाला नाही, हा व असा अन्य युक्तिवाद ईडीने विशेष केला. त्यावर उत्तर देताना भुजबळांच्या वकिलांनी हा अधिकाराचा प्रश्न नसून, घटनात्मक कर्तव्याचा आहे, असे सांगत युक्तिवाद केला.

विशेष न्यायालयाने दिली परवानगी
विशेष न्यायालयाने भुजबळांच्या वकिलांचा युक्तिवाद स्वीकारत, भुजबळ यांना मतदान करण्याची परवानगी दिली. भुजबळांना मतदानासाठी विधिमंडळात नेण्याचे व आणण्याचे निर्देशही पोलिसांना दिले.

Web Title: Voting of voting Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.