Rajya Sabha Election : मतदानाला मुकावे लागणार, नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना कोर्टाने दिला दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 03:33 PM2022-06-09T15:33:04+5:302022-06-09T16:36:48+5:30
Special PMLA court rejects applications of Nawab Malik and Anil Deshmukh : नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणुकीत मतदानाला मुकावे लागणार आहे.
मुंबई : विशेष पीएमएलए न्यायालयाने (Special PMLA Court) महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मोठा दणका दिला आहे. उद्या होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी द्यावी असा अर्ज मलिक आणि देशमुख यांच्यावतीने करण्यात आला. परंतु कोर्टाने हा अर्ज नाकारला त्यामुळे उद्याच्या मतदानातनवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना सहभाग घेता येणार नाही.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजपाने ३, शिवसेनेने २, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी एक- उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. या निवडणुकीत सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना-भाजपा यांच्यात थेट लढत आहे. येत्या १० जूनला मतदान होणार असून तत्पूर्वी कुठलाही घोडेबाजार होऊ नये यासाठी सत्ताधारी पक्ष विशेष खबरदारी घेत आहे. या निवडणुकीसाठी १ मतही महत्त्वाचे असल्याने महाविकास आघाडीची २ मते बाद झाल्याने मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी मविआ नेत्यांना आणखी कसरत करावी लागणार आहे.
Mumbai | The lawyer of former Maharashtra minister Anil Deshmukh has requested a certified copy of the order as soon as possible so as to enable them to approach the High Court today.
— ANI (@ANI) June 9, 2022