लोणावळ्यातील वळवण धरण फुल्ल,  इंद्रायणी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 04:22 PM2017-08-29T16:22:27+5:302017-08-29T16:29:32+5:30

लोणावळा शहराला पाणीपुरवठा करणारे टाटा कंपनीचे वळवण धरण पूर्णतः भरले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याने इंद्रायणी नदीकाठच्य‍ा गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Vulnerable alert to villages on the Dhanvana dam, Indrayani Katha in Lonavala | लोणावळ्यातील वळवण धरण फुल्ल,  इंद्रायणी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा 

लोणावळ्यातील वळवण धरण फुल्ल,  इंद्रायणी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा 

Next

लोणावळा, दि. 29 - लोणावळा शहराला पाणीपुरवठा करणारे टाटा कंपनीचे वळवण धरण पूर्णतः भरले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याने इंद्रायणी नदीकाठच्य‍ा गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  टाटा कंपनीकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  वळवण धरणातून लोणावळा व परिसरातील गावांना पिण्याचे पाण्यासोबत खोपोली पॉवर हाऊस येथे वीज निर्मितीसाठी पाणी सोडण्यात येते. लोणावळा परिसरात मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वळवण धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. वळवण धरणाची क्षमता ही 72.12 एमसीएम (635.20 मीटर) असून सध्या धरणात 63.76 एमसीएम (633.79 मीटर) पाणीसाठा झाल‌ा आहे. पावसाचा जोर सुरू असल्याने धरणात 634.20 मीटर पाणीसाठा झाल्यानंतर धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. 

धरणातून पाणी वळवण येथून सोडल्यानंतर इंद्रायणी नदीला पूर येण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सर्तक राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. सध्या टाटाच्या डक्टलाईने तसेच आऊटलेटमधून रायगड जिल्ह्यात पाणी सोडण्यात आले आहे. पावसाचा जोर वाढला व आवश्यकता भासल्याने दोन गेटमधून पाणी सोडण्यात येणार असल्याचे टाटा कंपनीच्या अधिकार्‍यांनी सांगितले.


 

Web Title: Vulnerable alert to villages on the Dhanvana dam, Indrayani Katha in Lonavala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण