विनाशाच्या उंबराटयावर गिधाडपक्षी
By admin | Published: October 6, 2016 08:01 PM2016-10-06T20:01:39+5:302016-10-06T21:04:14+5:30
एके काळी लाखोंच्या संख्येने असणारे माळढोक पक्षी आता महाराष्ट्रात फक्त 50 ते 55 इतकेच उरले आहेत , भारतातील 98% गिधाडे नामशेष झाली आहे. विनाशाच्या उंबराटयावर
ऑनलाइन लोकमत
सिल्लोड, दि. 06 - एके काळी लाखोंच्या संख्येने असणारे माळढोक पक्षी आता महाराष्ट्रात फक्त 50 ते 55 इतकेच उरले आहेत , भारतातील 98% गिधाडे नामशेष झाली आहे. विनाशाच्या उंबराटयावर गिधाडपक्षी आहे. यांना वाचविन्यासाठी सिल्लोड शहरात गुरुवारी(दि.6 रोजी) जनजागृती करण्यात आली.
सिल्लोड येथील अभिनव प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेतर्फे वन्यजीव सप्तााह (2 ते 8 ऑक्टो.) निमित्त नामशेष होत जाणाऱ्या माळढोक व गिधाड या पक्षांबद्दल माहिती देणाऱ्या विनाशाच्या उंबराटयावर या पोष्टर चे प्रकाशन सिल्लोड शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक के. के. पाटील यांच्या हस्ते शहर पोलीस स्टेशनच्या प्रांगणात दि 06 ऑक्टो. रोजी करण्यात आले. पर्यावरणासाठी पक्ष्यांचे महत्व यात नमूद केले आहे. जनजागृती होण्यासाठी तालुक्यातील सर्व शाळा , कॉलेज , वाचनालय व शासकीय कार्यलयांना हे भिंती चित्र विनामूल्य भेट देण्यात येणार आहे .
या वेळी नगरसेवक अशोक साळवे ,शेकबाबर, दिगंबर आंबेकर,ता. शि. सं. अ.राहुल पवार यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती .हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष उपनगराध्यक्ष किरण पाटील पवार, विजय चव्हाण डॉ . संतोष पाटील, संदीप चव्हाण, रमेश चव्हाण,आनंद खेत्रे , भाऊसाहेब जंगले, गणेश चव्हाण, पवन दौड,प्रभू जंजाळ,दीपक पाटील ,ज्ञानेश्वर घोडके ,प्रभाकर खोडके ,मनोज खरात संभाजी ढमाले, संतोष लक्कस, संदीप पवार, जगदीश चापे, योगेश ठोंबरे, भगवान पंडित,सुनील आरते, राम घोडके,नितीन एण्डोले,निलेश कुलकर्णी, अजय बोराडे, चरण मोरे, संदीप ठाकूर, रंजीत सपकाळ ,कृष्ण गजभारे, विजय काकडे, प्रभाकर खिल्लारे,उमेश देहाडे, नितीन गायकवाड,अविनाश इंगळे , गौतम देहाडे, अमोल सपकाळ, राहुल सोमासे, सतीश सपकाळ, शिवाजी दाबके, सुभाष सपकाळ, रवी सपकाळ , प्रशांत वैद्य ,सलमान शाह , किशोर वैद्य पंकज दांडगे ,शेक सलीम , शेक रियाज,मनोज बोर्डे दिनेश बर्डे ,रत्नाकर कुमावत ,सचिन पारधे,अभय वाघ, गणेश तांगडे, गजानन पडोळ यांनी परिश्रम घेतले .