'रात्रीस खेळ चाले'चं शूटिंग झालेला वाडा

By admin | Published: March 12, 2016 02:33 PM2016-03-12T14:33:19+5:302016-03-12T14:54:30+5:30

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत कोकणाची पार्श्वभूमी असून या मालिकेचे शूटिंगही कोकणातील ख-याखु-या वाड्यातच सुरू आहे.

Wada shot to 'play the game in the night.' | 'रात्रीस खेळ चाले'चं शूटिंग झालेला वाडा

'रात्रीस खेळ चाले'चं शूटिंग झालेला वाडा

Next
विजय पालकर
माणगाव, दि. १२ - 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेची सध्या बरीच चर्चा सुरू असून या वाड्याबद्दलही अनेकांना उत्सुकता आहे. कोकणाची पार्श्वभूमी असलेल्या या मालिकेचे शूटिंगही कृत्रिम सेट न उभारत कोकणातील ख-याखु-या वाड्यातच सुरू आहे. त्याबद्दलची ही माहिती खास तुमच्यासाठी...!
सिंधुदुर्गातील कुडाळ आकेरी येथे शेटकर यांच्या वाड्याच चित्रित केली जात आहे. यापूर्वी या वाड्यात ' महानंदा' व ' गांरबीचा बापू' या चित्रपटांचे चित्रीकरण झाले होते. सिंधुदुर्गातील नैसर्गिक सौंदर्याची लोकेशन्स तसेच मानवनिर्मित जुनी घरं ही विविध सिनेनिर्मात्यांना आकर्षित करतात. मात्र या सीरियलमध्ये 'कोकणात भूत आहे' असे दाखवले जात आहे, त्यामुळे कोकणात पर्यटक येणार नाहीत अशी राजकीय पक्षांची ओरड झाल्यामुळे या सीरियलची जाहिराच आपोआप झाली.
खरंतर सीरियलचे कथानक किमान दीडशे ते दोनशे भागांचे असतं. त्यामुळे एक दोन भागात त्यावर भाष्य करणं चुकीचं आहे. या सीरियलमुळे स्थानिक कलाकारांना एक व्यासपीठ मिळालं, अनेकांना रोजगार मिळाला.  भविष्यात कोकणातील नैसर्गिक सौंदर्याकडे सिनेमा निर्माते आकर्षित होतील व प्रत्येक ठिकाणी निसर्गाने उभारलेल्या नैसर्गिक सेटचा फायदा सीरियल व सिने निर्मात्यांना मिळेल, अशा प्रकारची अनेक ठिकाणी लोकेशन्स आहेत. त्याचाही विचार होऊन सिंधुदुर्गात जास्तीत जास्त सीरियल व सिने निर्माते कसे येतील हे पाहणे जिल्ह्याच्या विकासाचे ठरेल.
 
 
 
 

Web Title: Wada shot to 'play the game in the night.'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.