वाडा स्टॅण्ड २१ वर्षे पडून
By admin | Published: May 17, 2016 04:27 AM2016-05-17T04:27:21+5:302016-05-17T04:27:21+5:30
२१ वर्षानंतरही हे ते वापरात नसल्याने धूळ खात पडून असून त्यामुळे एस. टी. महामंडळाचा लाखो रुपये खर्च वाया गेला
वसंत भोईर,
वाडा- या शहरातील मुख्य बाजारपेठेलगत असलेले जुने बसस्थानक अपुरे पडत असल्यामुळे प्रवाशांची व बस चालक, वाहक यांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन सन १९९५ साली मनोर महामार्गालगत व वाड्यापासून सुमारे दीड कि. मी. अंतरावरील प्रशस्त जागेत लाखो रु पये खर्च करून सुसज्ज असे बसस्थानक बांधण्यात आले. मात्र २१ वर्षानंतरही हे ते वापरात नसल्याने धूळ खात पडून असून त्यामुळे एस. टी. महामंडळाचा लाखो रु पये खर्च वाया गेला आहे.
वाडा गावाच्या मुख्य बाजार पेठेलगत जुने बसस्थानक आहे. हे बसस्थानक अत्यंत कमी जागेत असल्यामुळे बस गाड्या पुढे मागे घेताना चालक व वाहकांना प्रचंड त्रास होतो व वाहतूककोंडी होते अपघातही घडतात शिवाय प्रवाशांचीही अत्यंत गैरसोय होते हे लक्षात घेऊन महामंडळाने सन १९९५ साली सुमारे १३ एकर जागेवर आगाराची निर्मिती केली. या भूखंडाचे दोन विभाग करण्यात आले. त्यापैकी सहा एकरात बसस्थानक व सात एकरात आगार करण्यात आले. बसस्थानकाची इमारत ( शेड ) सुद्धा त्यावेळी लाखो रु पये खर्च करून बांधण्यात आली. मात्र त्यावेळी हे बसस्थानक गावापासून दूर असल्याने तिथे जाण्यास नागरिकांनी विशेषत: व्यापा-यांनी प्रखर विरोध केला त्यामुळे जुनेच बसस्थानक कायम ठेवले गेले व नवीन बसस्थानक पडून राहिले.
सद्यस्थितीत वाडा - मनोर या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम झाले आहे. या मार्गाला लागूनच नवीन बसस्थानक आहे. तसेच वाडा न्यायालयाची इमारत त्याच प्रमाणे रहिवाशी वसाहती या आगाराच्या आजूबाजूला झालेल्या आहेत. त्यामुळे येथील लोकवस्ती वाढली आहे. शिवाय या पंचक्र ोशीत वाढत असणारी औद्योगिक वसाहत या सर्वकष वस्तुस्थितीचा विचार करता वाडा आगाराला लागून असलेले नवीन बसस्थानक सुरू करणे अत्यावश्यक ठरणार आहे.
नवीन बसस्थानकात विस्तीर्ण अशी जागा असल्याने ती वापरात येऊन गाड्यांची सोय करणे चांगले होईल इतर आगाराच्या वाड्याहून जाणार्या बसगाड्या वाडा बस स्थानकात थांबल्याने गाड्यांच्या गदीॅत वाढ होते अशा बाहेरील आगार विभागाच्या गाड्या प्रथम आगारानजीकच्या प्रस्तावित नवीन बसस्थानकावर येतील तेथे त्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे थांबा घेऊन त्या सध्याच्या स्थानकावरून नोंद करून मार्गस्थ होतील. ठाणे, पालघर, बोईसर, जव्हार, डहाणू कडे जाणाऱ्या गाड्या ह्या जुन्या स्थानकावर नोंद करून त्वरीत प्रस्तावित बसस्थानकात येऊन त्यांच्या वेळापत्रकानुसार थांबा घेतील. वाडा आगाराच्या ग्रामीण भागात चालणाऱ्या सर्व फेऱ्या सध्याच्या पध्दतीप्रमाणे व
पंचक्र ोशीतील मागणी येईपर्यंत जुन्या बसस्थानका वरून मार्गस्थ होतील. त्यामुळे बाजारपेठेतील वाहतूकीची कोंडी कमी होईल. अनेक शहरात जवळ जाणाऱ्या गाड्यांसाठी छोटे बसस्थानक व लांबपल्ल्यांच्या गाड्यांसाठी विस्तृत नवे बसस्थानक आहे. असा प्रयोग ठाणे, नाशिक, पुण्यात यशस्वी झाला आहे. तसाच तो वाडा येथे करायला काय हरकत आहे?