वडवली हत्याकांड : सुबियाची आर्त हाक शेजाऱ्यांच्या कानावर गेली असती

By admin | Published: March 9, 2016 05:47 AM2016-03-09T05:47:49+5:302016-03-09T05:47:49+5:30

हसनैन वरेकरने बहिण बत्तुल आणि आई असगडी यांच्यावर सुऱ्याने वार केल्यानंतर तो बहिण सुबियाच्या मागे लागला. जीव वाचवण्याकरिता ती बेडरुममध्ये शिरली आणि तिने कडी लावून घेतली

Wadwali massacre: The story of Suba's voice was heard by neighbors | वडवली हत्याकांड : सुबियाची आर्त हाक शेजाऱ्यांच्या कानावर गेली असती

वडवली हत्याकांड : सुबियाची आर्त हाक शेजाऱ्यांच्या कानावर गेली असती

Next

जितेंद्र कालेकर, ठाणे
हसनैन वरेकरने बहिण बत्तुल आणि आई असगडी यांच्यावर सुऱ्याने वार केल्यानंतर तो बहिण सुबियाच्या मागे लागला. जीव वाचवण्याकरिता ती बेडरुममध्ये शिरली आणि तिने कडी लावून घेतली. सुबियाला धमकावण्याकरिता घराचा मुख्य दरवाजा उघडून हसनैन बाहेर आला होता. त्यावेळी सुबियाची आर्त हात ऐकून आजूबाजूचे धावून आले असते व त्यांनी हसनैनला पकडले असते तर हा क्रुरकर्मा पोलिसांच्या हाती लागला असता, असे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे मत आहे.
सुबियाने खोलीचा दरवाजा उघडून बाहेर यावे याकरिता तो
तिची मुलगी अल्फीयाला ठार मारण्याची धमकी देत होता. ही धमकी देताना तो काही काळ घराबाहेर आला होता. परंतु लागलीच सावध होत त्याने पुन्हा घराचा मुख्य दरवाजा बंद केला. हसनैन बाहेर असताना आजूबाजूच्या लोकांनी त्याला जेरबंद केला असता तर आपल्या कृत्यामागील कारणमिमांसा करण्याकरिता तो आज कोठडीत असता. हसनैनने प्रथम दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. तो न तुटल्याने त्याने घराच्या बाहेर जाऊन सुबियाला धमकावले. घराबाहेर उभा राहून हसनैन काही काळ ओरडत होता. मात्र त्याच्याकडे लक्ष न देता सुबियाने बहिण शबिनाचा मोबाईल चालू करण्याचा प्रयत्न केला. हसनैन घराबाहेर असताना पकडला गेला असता किंवा सुबियाला तो फोन सुरु करता आला असता तर कदाचित चित्र वेगळे असते, असे मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.रात्री पावणेबारा वाजता सुबियाने पती सोजब भरमार यांना फोन केला व मुलगी सतत रडत असल्याने घ्यायला येण्याची विनंती केली होती, परंतु रात्र बरीच झालेली असल्यामुळे त्यांनी सकाळी येतो, असे सांगितले. सोजब तासभरात वरेकरांच्या घरी आले असते, तरी हसनैन हे कृत्य करायला धजावला नसता किंवा जिवंत पकडला गेला असता, असे काहींचे म्हणणे आहे.आणखी काही प्रश्न अनुत्तरीतच आहेत..
हसनैन याच्याकडे आजोबा गुलजार यांच्याकडून मिळालेले आई आणि मावशी यांच्या वाट्याचे ३० लाख रुपये होते. याखेरीज अन्य लोकांकडून त्याने कर्जाऊ पैसे घेतले होते. एकूण ७० लाखांचे कर्ज हसनैनने केले होते. एवढी मोठी रक्कम त्याने शेअर मार्केटमध्ये गुंतवली की उधळली याचा उलगडा अद्याप झालेला नाही.
> ख्वाजा गरीब नवाज कमिटीचा सदस्य
हसनैन हा ख्वाजा गरीब नवाज कमिटीचा सदस्य होता. त्या कमिटीतील सभासद तैफूर, सलीम, शकफ, जमीर आणि नाजीम यांच्याशी त्याचे संबंध होते, परंतु त्याची कोणाशीही मैत्री नव्हती.
संशयी वृत्तीचा असल्याने त्याच्या ओळखीचे कोणी घरी येत नसत. वर्षातून एकदा जलशाच्या निमित्ताने १० ते १५ मौलांनांना तो घरी जेवायला बोलवायचा. त्यांच्यापैकी सय्यद कौसर रब्बानी हे जबलपूरचे मौलाना दर वर्षी घरी यायचे. ते कधी-कधी मुक्कामालाही असायचे, अशी माहिती सुबियाकडून पोलिसांना मिळाली आहे.

Web Title: Wadwali massacre: The story of Suba's voice was heard by neighbors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.