धुळ्यातील घाणेगावात वायफाय शाळा !
By admin | Published: November 5, 2016 12:05 AM2016-11-05T00:05:19+5:302016-11-05T00:05:19+5:30
साक्री तालुक्यातील घाणेगाव येथे जिल्ह्यातील पहिल्या ‘वायफाय’ युक्त डिजीटल शाळेचे उद्घाटन शुक्रवारी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्याहस्ते झाले.
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 04 - साक्री तालुक्यातील घाणेगाव येथे जिल्ह्यातील पहिल्या ‘वायफाय’ युक्त डिजीटल शाळेचे उद्घाटन शुक्रवारी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्याहस्ते झाले. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील शिक्षक अॅडम ग्रील यांच्याशी ‘वायफाय’च्या माध्यमातून संवाद साधला.
आजच्या आधुनिक काळात शिक्षण क्षेत्राला अलिप्त राहून चालणार नाही़ तंत्रज्ञानाच्या, संगणकीकरणाच्या माध्यमातून शक्य तेवढ्या अत्याधुनिक सुविधा विद्यार्थ्यांना उलपब्ध होत आहेत. या सुविधांच्या मदतीने विद्यार्थ्यांना ज्ञानाचे नवीन स्त्रोत उपलब्ध व्हावेत हेच ध्येय शिक्षण विभागाचे असल्याचे मत नंदकुमार यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण पाटील, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोहन देसले, डाएटच्या प्राचार्या विद्या पाटील, माजी आमदार जे़यू़ठाकरे, शिक्षण सभापती नुतन पाटील, गटशिक्षणाधिकारी भिल, शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र पगारे, व्ही़व्ही़पवार, एस़ई़बागुल आदी मान्यवर उपस्थित होते. घाणेगाव हे धुळ व साक्री तालुक्याच्या सीमेवरील छोटेसे गाव असून इच्छाशक्तीच्या जोरावर येथील शाळेचे मुख्याध्यापक किशोर पाटील व शिक्षक वृंदांनी ग्रामस्थांच्या मदतीने पहिली वायफाय सुविधा असलेली डिजीटल शाळा साकारली आहे़ या नवीन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते.