ताडोबातील वाघ टपाल तिकिटावर
By admin | Published: July 27, 2016 01:18 AM2016-07-27T01:18:14+5:302016-07-27T01:18:14+5:30
जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघाचे छायाचित्र असलेल्या टपाल तिकिटाचे प्रकाशन येत्या २९ जुलै रोजी जागतिक व्याघ्रदिनी होणार आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर : जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघाचे छायाचित्र असलेल्या टपाल तिकिटाचे प्रकाशन येत्या २९ जुलै रोजी जागतिक व्याघ्रदिनी होणार आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला होता.
ताडोबाच्या जंगलातील एक वाघीण आपल्या बछड्यावर माया करत असतानाचे हे छायाचित्र चंद्रपूरच्या अमोल बैस या तरुण हौशी वन्यजीव छायाचित्रकाराने टिपले. या छायाचित्रातून प्रगट होणारे ममत्व लक्षात घेत वनमंत्री मुनगंटीवार यांनी या छायाचित्राचे टपाल तिकीट प्रकाशित व्हावे, यासाठी केंद्रीय संचार मंत्री रविशंकर प्रसाद यांना प्रत्यक्ष भेटून विनंती केली.
या छायाचित्रासह ताडोबा अभयारण्याचे महत्त्व व तेथील व्याघ्र वैभवाचा सविस्तर तपशील त्यांनी रविशंकर प्रसाद यांना सादर केला. सतत पाठपुरावा केल्याने आता टपाल तिकीट प्रकाशित होत आहे. (प्रतिनिधी)
यापूर्वीही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा करून तुकाराम महाराजांचे पट्टशिष्य संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज, १८५७च्या स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिश सरकारशी झुंज देत शहीद झालेले क्रांतिवीर बाबूराव पुलेश्वर शेडमाके, आनंदवनाच्या माध्यमातून कुष्ठरुग्णांच्या जीवनात आनंद फुलविणारे थोर समाजसेवक कर्मयोगी बाबा आमटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ टपाल तिकीट प्रकाशनासाठी यशस्वी प्रयत्न केले होते.