अजून चार दिवस वाट पाहा
By admin | Published: June 16, 2016 02:39 AM2016-06-16T02:39:54+5:302016-06-16T02:39:54+5:30
नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) येणार... येणार... म्हणून आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या महाराष्ट्राला अजून तीन-चार दिवस वाट पाहावी लागणार आहे. पुढील ४८ तासांत राज्यात कोठेही जोरदार पाऊस
पुणे : नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) येणार... येणार... म्हणून आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या महाराष्ट्राला अजून तीन-चार दिवस वाट पाहावी लागणार आहे. पुढील ४८ तासांत राज्यात कोठेही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता नाही. पाऊस लांबल्याने राज्याच्या तापमानात मात्र पुन्हा वाढ होऊ लागली आहे. बुधवारी चंद्रपूरमध्ये सर्वाधिक ४४.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.
मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर कर्नाटक आणि गोव्यातही तो दाखल झाला आहे, परंतु पाच दिवस उलटले, तरी राज्यात सक्रीय होण्याची चिन्हे नाहीत. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, मान्सूनला महाराष्ट्रात दाखल होण्यास अनुकूल स्थिती निर्माण होत असून, ३ ते ४ दिवसांत त्याचे आगमन होईल. सध्या महाराष्ट्रात पूर्व मोसमी पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. गेल्या २४ तासांत कोकणात काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भ आणि मराठवाडा तर कोरडाच होता. गुहाघर, संगमेश्वर, वैभववाडी, वेंगुर्ला, राधानगरी येथे ३०, चिपळूणमध्ये २०, कणकवली, महड, मालवण, रत्नागिरी, सावंतवाडी, गगनबावडा, महाबळेश्वर येथे १० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. (प्रतिनिधी)