प्रतिक्षा संपली; नळदुर्गच्या नर-मादी धबधब्यातून कोसळू लागले पाणी...
By Appasaheb.patil | Published: October 22, 2019 02:40 PM2019-10-22T14:40:46+5:302019-10-22T14:44:15+5:30
पर्यटकांची वाढली गर्दी; चांगल्या पावसामुळे बोरी नदी गच्च भरली...
सोलापूर : यंदा वरुणराजाने चांगली हजेरी लावल्याने येथील बोरी धरण भरून सांडवा वाहायला सुरुवात झाली. या सांडव्याच्या पाण्याने बोरी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने नळदुर्ग किल्ल्यातील नर-मादी धबधब्यातून पाणी कोसळू लागले़ त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आतुरतेने वाट पाहणाºया पर्यटकांची प्रतीक्षा आता संपली आहे.
नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) येथील ऐतहासिक किल्ल्यातील स्थापत्य शास्त्रातील अदभूत चमत्कार समजला जाणारा नर-मादी धबधबा तब्बल तीन वषार्नंतर शुक्रवारी सकाळपासून सुरु झाला. सोलापूरपासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्लयातील प्रेक्षणीय पाणी महाल येथील नर-मादी धबधबा सोमवारी सुरू झाला. यामुळे पर्यटकांची गर्दी वाढली आहे.
नळदुर्ग किल्ला हा उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात आहे़ सोलापूर-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावर नळदुर्ग आहे़ सोलापूरहुन साधारण:पणे ४० ते ५० किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे़ किल्लयात तत्कालीन निजाम शासकाने बोरी नदी किल्लयात वळवून त्यावर मोठा बंधारा बांधून त्यावर दोन धबधबे तयार केले आहेत. नदी पात्रातील अतिरिक्त पाणी याच दोन्ही धबबध्यातून वाहून जाण्याची व्यवस्था केली आहे.