महाराष्ट्रात रेल्वेमार्गावरील ८१ पुलांचे काम सुरू होण्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 04:00 AM2018-07-27T04:00:35+5:302018-07-27T04:01:06+5:30
६ पूल तयार, २० पुलांचे काम प्रगतिपथावर असल्याची रेल्वे राज्यमंत्र्यांची माहिती
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : महाराष्ट्रात रेल्वेमार्गावर १०७ पूल बांधण्यात येणार असून यापैकी ८१ पुलांचे काम अद्याप सुरू झालेले नाही. केंद्र सरकारच्या माहितीनुसार ६ पूल तयार झाले असून २० पुलांचे काम प्रगतिपथावर आहे.
रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहैन यांनी सांगितले की, रेल्वे मंत्रालय आणि महाराष्टÑ सरकारच्या संयुक्त हिस्सेदारीतून उभारण्यात येणाऱ्या पुलांना मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकार, रेल्वे मंत्रालय आणि मार्ग परिवहन-महामार्ग मंत्रालयादरम्यान एक करार झाला आहे. भाजपचे हरीश चव्हाण यांच्या प्रश्नाला राज्यमंत्री गोहैन यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, या करारानुसार रेल्वेच्या हिश्श्याच्या कामासह उर्वरित काम महाराष्टÑ सरकारला पूर्ण करायचे आहे. रेल्वेमार्गावरील प्रलंबित पुलांच्या (रेल्वे ओव्हर ब्रीज) कामाबाबत त्यांनी सांगितले की, या करारानंतर पुढील कार्यवाही महाराष्ट्र सरकारला करायची आहे.