तपोवन विकासाची प्रतीक्षा!
By admin | Published: June 12, 2016 01:51 AM2016-06-12T01:51:51+5:302016-06-12T01:51:51+5:30
जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील वृक्ष-वेलींनी नटलेल्या तपोवनचा विकास रखडला आहे. हा विकास साधल्यास जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळू शकेल.
- विवेक चांदूरकर, वाशिम
जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील वृक्ष-वेलींनी नटलेल्या तपोवनचा विकास रखडला आहे. हा विकास साधल्यास जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळू शकेल.
मालेगाव तालुक्यात अमानीजवळ तपोवन आहे. ही जागा वनविभागाच्या ताब्यात आहे. वृक्षवेलींनी नटलेल्या या भागात निसर्गरम्य परिसर आहे. येथे एक मोठा नाला असून, ठिकठिकाणी नैसर्गिक तळेही आहेत. यासोबतच या परिसराला ऐतिहासिक परंपराही लाभली आहे. महादेवाचे पुरातन मंदिर आहे. देवीचे व शनी देवाचेही येथे मंदिर आहे.
या परिसरात सहा ते सात विहिरी आहेत. यामध्ये विटा व दगडांनी बांधलेल्या दोन बारवही आहेत. बाराही महिने पाणी असलेल्या या विहिरींमध्ये या वर्षी उन्हाळ््यात पाणी नव्हते. या विहिरींमध्ये कचरा व गाळ साचलेला आहे, त्यामुळे त्यांच्या सफाईची गरज आहे.