दिवाळीसाठी वेटिंग वाढले, सर्वच गाड्या फुल्ल
By admin | Published: September 15, 2016 08:23 PM2016-09-15T20:23:40+5:302016-09-15T20:23:40+5:30
दिवाळीला दीड महिना शिल्लक असताना दिवाळीच्या काळातील सर्व रेल्वेगाड्यातील आरक्षण फुल्ल झाले आहे. सर्वच रेल्वेगाड्यांचा ताबा दलालांनी घेतल्यामुळे प्रतीक्षा यादी (वेटिंग) ४०० च्या आसपास
Next
ऑनलाइन लोकमत
नागपूर,दि.15- दिवाळीला दीड महिना शिल्लक असताना दिवाळीच्या काळातील सर्व रेल्वेगाड्यातील आरक्षण फुल्ल झाले आहे. सर्वच रेल्वेगाड्यांचा ताबा दलालांनी घेतल्यामुळे प्रतीक्षा यादी (वेटिंग) ४०० च्या आसपास पोहोचली आहे. तर काही गाड्यांचे तिकीटच मिळणे बंद झाले (रिग्रेट) आहे. यामुळे आता दिवाळीत प्रवाशांना दुप्पट ते तिप्पट तिकिटाचे शुल्क भरून महागड्या खासगी ट्रॅव्हल्स, विमानाने प्रवास करण्याची वेळ येणार आहे.
दिवाळीनिमित्त अनेकजण आपल्या कुटुंबीयांसोबत हा सण साजरा करण्याला प्राधान्य देतात. यामुळे या काळात खासगी ट्रॅव्हल्सचे दर गगनाला भिडल्याची स्थिती असते. एरवी ७०० ते ९०० रुपयांना मिळणारे ट्रॅव्हल्सचे तिकीट दिवाळीच्या काळात तीन हजार रुपयांवर पोहोचते. प्रवासाचे सर्वात स्वस्त आणि फायदेशीर माध्यम म्हणून असंख्य प्रवासी रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य देतात. प्रवाशांच्या या मानसिकतेचा फायदा घेऊन दिवाळीतील सर्व आरक्षित तिकिटांवर दलालांनी ताबा मिळविल्याची स्थिती आहे. दिवाळीच्या काळात नागपुरातून मुंबई, पुणे, दिल्ली आणि बहुतांश शहरात जाणाºया सर्वच रेल्वेगाड्यांचे ‘वेटिंग’ वाढले आहे. दिवाळीला दीड महिना असताना आताच आरक्षणाची ही स्थिती निर्माण झाल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला ताण पडणार हे निश्चित झाले आहे.