अंतिम यादीनंतरही प्रतीक्षा

By admin | Published: June 25, 2014 01:45 AM2014-06-25T01:45:15+5:302014-06-25T01:45:15+5:30

प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची तिसरी आणि अंतिम गुणवत्ता यादी महाविद्यालयांनी मंगळवारी जाहीर केली.

Waiting even after the final list | अंतिम यादीनंतरही प्रतीक्षा

अंतिम यादीनंतरही प्रतीक्षा

Next
>मुंबई : प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची तिसरी आणि अंतिम गुणवत्ता यादी महाविद्यालयांनी मंगळवारी जाहीर केली. नामवंत महाविद्यालयांची वाणिज्य शाखेची गुणवत्ता यादी 80 ते 90 टक्क्यांवर बंद झाल्याने वाणिज्य शाखेच्या विद्याथ्र्याची ऑफलाइन प्रवेशासाठी दमछाक होणार आहे.
मुंबई विद्यापीठाशी संलगA असलेल्या महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम गुणवत्ता मंगळवारी सायंकाळी 6 वाजता जाहीर झाली. मुंबईतील नामवंत महाविद्यालयांतील विज्ञान शाखेची यादी 70 ते 80 टक्केर्पयत कमी झाली. परंतु वाणिज्य शाखेतील विद्याथ्र्याना बारावी परीक्षेत अधिक टक्के मिळाले असले तरी त्यांना प्रवेश मिळविताना दमछाक उडाली. यंदा बारावीचा निकाल विक्रमी लागल्याने याचे परिणाम प्रवेश प्रक्रियेवरही झाला. तिस:या गुणवत्ता यादीतही प्रवेश न मिळालेल्या विद्याथ्र्याना आता ऑफलाइन प्रवेश प्रक्रियेवर अवलंबून राहावे लागणार आहे. कला शाखेची तिसरी गुणवत्ता यादी सुमारे 60 ते 55 टक्क्यांवर बंद झाली. पदवी अभ्यासक्रमांच्या यापूर्वी जाहीर झालेल्या दोन गुणवत्ता यादींमध्येही वाणिज्य शाखेची यादीत 90 टक्क्यांवर बंद झाली होती. अंतिम यादीत तरी नाव झळकावे, याची प्रतीक्षा करीत असलेल्या विद्याथ्र्याना या यादीतही प्रवेश मिळाला नाही. सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
 
रुईया महाविद्यालय
कला शाखा- 82 }
एफवायबीएमएम (इंग्रजी माध्यम)-
विज्ञान - 82.क्2}, वाणिज्य - 9क्}
एफवायबीएस्सी- 63.85 }
एफवायबीएस्सी  बायोटेक- 78.62 }
एफवायबीएस्सी कॉम्प्युटर सायन्स- 65.23 }
एफवायबीएस्सी बायोकेमिस्ट्री- 51.85}
एफवायबीएस्सी बायोअॅनॅलिटिकल- 52.92}
 
रुपारेल महाविद्यालय
वाणिज्य - 8क्.15 }
विज्ञान (जनरल)- 52.3क्}
एफवायबीएस्सी कॉम्प्युटर सायन्स- 73.क्7 }
कला - 8क्.61 }
 
हिंदुजा महाविद्यालय
बीएएफ - 80.31}
बीएफएम - 77.8}
बीबीआय - 72.31}
 
एफवायबीएमएस-
कला - 49.23 }
विज्ञान - 73.क्7 }
वाणिज्य - 8क्.46 }
 
बीएमएम
वाणिज्य - 80.31 }
विज्ञान - 79 }
कला - 68 }
 
टीवायबीकॉमचा आज निकाल ?
मुंबई :  मुंबई विद्यापीठामार्फतक्रेडिट अॅण्ड ग्रेड पद्धतीनुसार घेण्यात आलेल्या टीवायबीकॉम सेमिस्टर सहा परीक्षेचा निकाल बुधवारी रात्रीर्पयत जाहीर होण्याची शक्यता सूत्रंनी वर्तविली आहे.
 विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षांचे निकाल 45 दिवसांत जाहीर करणो बंधनकारक आहे. परंतु अनेक पेपर विलंबाने झाल्याने आणि विद्यापीठ अधिकारी, कर्मचा:यांसह महाविद्यालयांच्या कर्मचा:यांना निवडणुकीचे काम दिल्याने याचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता होती. परंतु विद्यापीठाने  निकाल वेळेत लावण्याचा अटोकाट प्रयत्न केला आहे. टीवायबीकॉम परीक्षेला सुमारे 65 हजार विद्यार्थी बसले आहेत. अखेर या परीक्षेचा निकाल बुधवारी रात्रीर्पयत जाहीर होणार असल्याचे विद्यापीठातील सूत्रंनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Waiting even after the final list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.