रेल्वेच्या स्वतंत्र कंपनीची प्रतीक्षा
By admin | Published: February 24, 2015 02:27 AM2015-02-24T02:27:11+5:302015-02-24T02:27:11+5:30
महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्याकरिता रेल्वे मंत्रालय, राज्य सरकार आणि खासगी कंपन्या यांच्यात स्पेशल पर्पज व्हेकल (एसपीजी) अर्था
संदीप प्रधान, मुंबई
महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्याकरिता रेल्वे मंत्रालय, राज्य सरकार आणि खासगी कंपन्या यांच्यात स्पेशल पर्पज व्हेकल (एसपीजी) अर्थात स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना धाडला असून हा प्रस्ताव मंजूर केल्याची घोषणा रेल्वे अर्थसंकल्पात केली गेली तर काही मोठे प्रकल्प भागीदारीत मार्गी लावण्यात येणार आहेत.
एसपीजी मार्फत जे प्रकल्प राबवण्याचा राज्य सरकारचा इरादा आहे, त्यामध्ये कळवा-ऐरोली एलिव्हेटेड कॉरीडोर, कर्जत-पनवेल दुपदरीकरण आणि नक्षलग्रस्त भागात विकासाचा मार्ग मोकळा करणारा वडसा-गडचिरोली रेल्वेमार्ग, कराड-चिपळूण रेल्वेमार्ग या चार प्रकल्पांचा समावेश असेल. एकूण आठ प्रकल्पांकरिता खर्चाच्या ५० टक्के रक्कम देण्याची तयारी राज्य सरकारने दाखवली आहे. त्यामधील दोन प्रकल्पांची अंमलबजावणी सुरु आहे.
वडसा-गडचिरोली प्रकल्पाला यापूर्वी मान्यता देण्यात आली असून नक्षलग्रस्तांच्या कारवाया रोखण्याकरिता हा प्रकल्प प्राधान्याने राबवण्याचे सरकारने ठरवले आहे. कराड-चिपळूण रेल्वेमार्ग जोडला गेला तर कोकण रेल्वे व उर्वरित रेल्वेमार्ग जोडला जाणार आहे.