तलाठय़ांना ‘लॅपटॉप’ व ‘प्रिन्टर’ची प्रतीक्षा !

By admin | Published: October 28, 2016 03:10 AM2016-10-28T03:10:59+5:302016-10-28T03:10:59+5:30

तलाठी व मंडळ अधिकारी समन्वय महासंघ आक्रमक झाला असून, चार वर्षांपूर्वीची घोषणा वा-यावर असल्याची स्थिती आहे.

Waiting for 'Laptops' and 'Printer' for talented people! | तलाठय़ांना ‘लॅपटॉप’ व ‘प्रिन्टर’ची प्रतीक्षा !

तलाठय़ांना ‘लॅपटॉप’ व ‘प्रिन्टर’ची प्रतीक्षा !

Next

संतोष वानखडे
वाशिम, दि. २६- महसूल विभागाचा कणा असलेल्या बहुतांश तलाठी व मंडळ अधिकार्‍यांना अद्याप लॅपटॉप व प्रिन्टर पुरविण्यात आलेले नाहीत. परिणामी, ह्यऑनलाइनह्ण कामकाजाचा बोजवारा उडत आहे.
महसूल विभागाचे कामकाज ह्यऑनलाइनह्ण करण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकार्‍यांना लॅपटॉप, प्रिन्टर पुरविण्याची घोषणा शासनाने चार वर्षांपूर्वी केली होती. मात्र राज्यातील आदिवासी विभाग वगळता अन्य विभागातील बहुतांश तलाठी व मंडळ अधिकार्‍यांना हे साहित्य अद्याप पुरविण्यात आलेले नाही. राज्यातील १0 हजार ५३६ तलाठी व १७६६ मंडळ अधिकारी या सुविधेपासून वंचित आहेत.
जिल्हा नियोजनच्या फंडातून ही साधने पुरविण्याऐवजी शासनाने ६२ कोटी रुपयांची स्वतंत्र वित्तीय तरतूद करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी व मंडळ अधिकारी समन्वय महासंघाने मुख्यमंत्र्यांकडे केली. मात्र, अद्याप या मागणीची दखल घेण्यात आली नाही. लॅपटॉप व प्रिन्टर नसल्यामुळे महसूलचे महत्त्वाचे दस्तावेज शेतकरी व संबंधित लाभार्थींना देण्यात अडथळे येत आहेत.

तलाठय़ांचे प्रशिक्षण केंद्रही बंद
तलाठय़ांना सहा महिने प्रशिक्षण देण्याची मागणी महसूलच्या विविध संघटनांनी शासनाकडे वारंवार केली होती. या मागणीची दखल म्हणून शासनाने २४ मार्च २0१४ रोजी प्रशिक्षणासंदर्भात आदेशही काढला. मात्र, या आदेशाची अद्याप अंमलबजावणी झाली नाही. नागपूर विभागात चंद्रपूर येथे प्रशिक्षण केंद्र आहे. मात्र निधीअभावी ते बंद पडले आहे.

- लॅपटॉप-प्रिंटरच्या मागणीची दखल घेतली नाही, तर राज्यभर टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा इशारा शासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.
- श्याम जोशी,
सरचिटणीस, तलाठी, पटवारी व मंडळ अधिकारी समन्वय महासंघ, महाराष्ट्र राज्य.

Web Title: Waiting for 'Laptops' and 'Printer' for talented people!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.