सीएसटीला ‘महाराजां’ची प्रतीक्षा

By Admin | Published: March 2, 2017 05:42 AM2017-03-02T05:42:39+5:302017-03-02T05:42:39+5:30

छत्रपती शिवाजी टर्मिनस या नावांमध्ये ‘महाराज’ हा शब्द समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने २0१६च्या डिसेंबर महिन्यात घेतला.

Waiting for 'Maharaj' to CST | सीएसटीला ‘महाराजां’ची प्रतीक्षा

सीएसटीला ‘महाराजां’ची प्रतीक्षा

googlenewsNext


मुंबई : रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस या नावांमध्ये ‘महाराज’ हा शब्द समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने २0१६च्या डिसेंबर महिन्यात घेतला. मात्र, दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही सीएसटीला अजूनही ‘महाराजां’ची प्रतीक्षाच आहे. राज्य सरकार आणि रेल्वेकडून याबाबत उदासीनता दाखविली जात असून, राज्यात, तसेच केंद्रात भाजपा सरकार असूनही त्याकडे पूर्णपणे दुर्लक्षच करण्यात आले आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीपूर्वी घातलेला निर्णय हा प्रत्यक्षात का अंमलात आला नाही, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
मध्य रेल्वेवरील सीएसटी म्हणजेच छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाच्या नावात ‘महाराज’ हा आदरार्थी असा शब्द नसल्याने, तो समाविष्ट करावा, असा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर आला आणि त्याला मंजुरीही २0१६ च्या डिसेंबर महिन्यात देण्यात आली. या निर्णयानंतर मध्य रेल्वेच्या सर्व यंत्रणेतच बदल करावा लागणार आहे. मध्य रेल्वेच्या ताफ्यात १४0 लोकल आहेत. या लोकलच्या समोरच्या दिशेने असणाऱ्या सीएसटी या नावात बदल करावे लागतील. या बदलाबरोबरच सर्वात मोठे बदल सीएसटीहून सुटणाऱ्या तब्बल ५0 मेल-एक्स्प्रेस व पॅसेंजर ट्रेनमध्ये करावी लागणार आहेत.
याबाबत राज्य सरकारकडून निर्णय घेतल्यानंतर, या कामाला वेग आलेला नाही. मध्य रेल्वेलाही रेल्वे बोर्डाकडून कोणतेही निर्देश आले नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे अद्याप सीएसटी नावात बदल करण्यात आले नसल्याची माहिती दिली.(प्रतिनिधी)
>एलफिन्स्टनचाही विसर
मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या नावात ‘महाराज’ हा आदरार्थी शब्द समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, काही दिवसांनी एलफिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाचे नावही बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. एलफिन्स्टनचे नाव बदलून ते प्रभादेवी करतानाच तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल, अशी माहिती त्या वेळी देण्यात आली. परंतु त्याचा विसरही शासनाला पडला.

Web Title: Waiting for 'Maharaj' to CST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.